शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

रेशीम विणकरांना मिळणार हातमाग!

By admin | Updated: October 6, 2015 04:17 IST

राज्यात पारंपरिकरीत्या रेशीमपासून साडी, वस्त्र विणण्याच्या व्यवसायाला बळकटी मिळावी, तसेच पारंपरिक हातमाग समूहातील विणकरांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा व त्यातून त्यांना

अकोला : राज्यात पारंपरिकरीत्या रेशीमपासून साडी, वस्त्र विणण्याच्या व्यवसायाला बळकटी मिळावी, तसेच पारंपरिक हातमाग समूहातील विणकरांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा व त्यातून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, या हेतूने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हातमाग पुरविण्यात येणार आहे. राज्यातील १०० विणकरांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्याकरिता शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ४० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.राज्यात हातमागावर तुती रेशीम/साडी निर्मितीचे काम प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील येवला, नागपूर जिल्ह्यातील कामठी, भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव, मोहाडी येथे पारंपरिकरीत्या सुरू आहे. या पारंपरिक व्यवसायाला बळकटी देण्यासाठी तसेच विणकरांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा, या हेतूने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हातमाग पुरवठा करण्याचा प्रस्ताव संचालक (रेशीम) यांनी शासनाला सादर केला होता. या प्रस्तावानुसार राज्यातील १०० विणकरांना हातमाग पुरवठा करण्याचे नियोजन आहे. सदर प्रस्ताव राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने मंजूर केला असून, त्याला प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी होते. शासनाने ५ आॅक्टोबर रोजी या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देतानाच राज्यातील १०० विणकरांना हातमाग पुरवठा करण्यासाठी प्रतिहातमाग ४० हजार याप्रमाणे ४० लाख रुपये व प्रकल्पाच्या प्रशासकीय खर्चाकरिता १.८० लाख, असा एकूण ४१.८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सदर योजना रेशीम संचालनालयाने निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रात तसेच विहित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी संचालक (रेशीम) यांच्यावर टाकण्यात आली आहे.