शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बेळगावचे नाट्य संमेलन रद्द होण्याची चिन्हे

By admin | Updated: December 11, 2014 23:47 IST

मराठी भाषिक संतप्त : सीमाप्रश्नावरून मोहन जोशींच्या माफीची मागणी

बेळगाव : ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने बेळगावात आगामी नाट्यसंमेलन घेणे शक्य नाही आणि मोहन जोशी यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखाविल्याबद्दल माफी मागावी, असे ठराव एकमताने मंजूर केले आहेत. यामुळे बेळगावचे नाट्यसंमेलन रद्द होण्याची शक्यता आहे.बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे काल, बुधवारी मोहन जोशी यांचा वार्तालापचा कार्यक्रम आयोजित केला होता. सीमाप्रश्न हा तुमचा आहे, तो तुम्हीच सोडवायचा. सीमाप्रश्न सोडविणे हे माझे काम नाही. राजकीय व्यक्ती आपल्या व्यासपीठावरून नाट्य संमेलनाबाबत बोलतात का? असे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले. त्यामुळे सीमावासीय मराठी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. परिणामी बेळगाव शाखेच्या कार्यकारिणीने आज, गुरुवारी तातडीची बैठक घेतली आणि मोहन जोशी यांनी सीमाप्रश्नाबाबत केलेल्या वक्तव्याशी बेळगाव शाखा सहमत नाही; मराठी भाषिकांच्या भावना दुखाविल्याबद्दल मराठी भाषिकांची मोहन जोशी यांनी माफी मागावी आणि आगामी नाट्य संमेलन बेळगावमध्ये घेणे शक्य नाही, असे तीन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले, अशी माहिती शाखेच्या सचिव नीना जठार यांनी पत्रकारांना दिली. जोशींची दिलगिरी नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या ठरावांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांनी सीमाप्रश्नाबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे म्हणत मोहन जोशींनी दिलिगरी व्यक्त केली.