शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मराठा जात प्रमाणपत्राचा श्रीगणेशा

By admin | Updated: July 24, 2014 22:58 IST

आरक्षण लागू झाल्यानंतर पहिलेच प्रमाणपत्र : वाशिम उपविभागाला मान

वाशिम : मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात पहिले प्रमाणपत्र वितरण करण्याचा मान मिळविला आहे. उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर यांच्या हस्ते २४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वैभव रमेश गलंडे (पाटील) या विद्यार्थ्याच्या पालकाला पहिले मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर वाशिमचे उपविभागीय अधिकारी अमानकर यांनी या प्रमाणपत्राबाबत लागणार्‍या कागदपत्रांची जनजागृती केली. जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्त्वात वाशिम उपविभागातील मंडळात व तालुकास्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना अधिकारी-कर्मचार्‍यांना दिल्या होत्या. नेमकी कोणती कागदपत्रे, दाखले पाहिजे, प्रस्ताव कुठे सादर करावयाचा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार वाशिम उपविभागात मराठा जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल झाले. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अमानकर यांचे स्वीय सहायक चव्हाण, लिपिक इंगोले व इतर कर्मचार्‍यांनीदेखील सकारात्मक भूमिका ठेवून प्रस्तावांचा तातडीने निपटारा केला आणि जिल्ह्यात मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण करण्याचा पहिला मान मिळविला. पोलिस विभागात कार्यरत अनिल गलंडे (पाटील) यांचा मुलगा वैभव याच्या नावाने पहिले जात प्रमाणपत्र तयार झाले आहे. सन २00४ मध्ये मराठा आरक्षणाचे प्रकरण महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे त्यांच्या शिफारशीसाठी विचारार्थ पाठविले होते. न्या.आर.एम.बापट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाने सन २00८ मध्ये मराठा आरक्षणाबाबत शासनास अहवाल सादर केला होता. सदर अहवालात मराठा समाजाला इतर मागास वर्ग या प्रवर्गात आरक्षण देता येणार नाही असे नमुद करण्यात आले होते. त्या अहवालावर मंत्रीमंडळाच्या उपसमितीने तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर मराठा समाजाचा शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा याबाबतची आयोगाने गोळा केलेली अपुरी साधार माहिती या मुद्यावर अहवाल सादर करण्यासाठी हे प्रकरण आयोगाकडे परत पाठविण्यात आले. तसेच विद्यमाने आरक्षणास बाधा न पोहोचविता मराठा समाजाला आरक्षण देता येईल किंवा कसे याबाबत मत देण्याची विनंती केली होती. यावर सांगोपांग विचार होऊन मराठा आरक्षण लागू करण्यात आले. राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्य घटनेच्या १५ (४), १५(५), १६ (४), व ४६ नुसार शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्ग (शै.सा.मा.प्र.) असा नविन प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. या प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत शासकीय तसेच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त १६ टक्के आरक्षण शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्गांतर्गत मराठा समाजास देण्यात आले. यानुसार उपविभागातील पात्र उमेदवारांनी जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन अशोक अमानकर यांनी केले आहे.