शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’चालकांना सिग्नलचे वावडे

By admin | Updated: August 2, 2016 01:49 IST

शहरामध्ये वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजले असताना पीएमपीच्या बस सिग्नलचे उल्लंघन करून यामध्ये भर घालत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

निगडी : शहरामध्ये वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजले असताना पीएमपीच्या बस सिग्नलचे उल्लंघन करून यामध्ये भर घालत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.सिग्नलवरील वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवणे अनिवार्य असते. जेणेकरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे शक्य होते. शहरातील एकाही सिग्नलवर या नियमाचे तंतोतंत पालन होत नाही. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून तर नेहमीच वाहतूक नियमांची ऐशीतैशी केली जाते. मात्र आता पीएमपीच्या बस देखील सिग्नल तोडण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले. लोकमत प्रतिनिधीने भक्ती - शक्ती चौकात पाहणी केली. तेव्हा असे दिसले की, आगारातून प्रवासी घेऊन निघणाऱ्या जवळपास सर्वच बस सिग्नल न पाळता निगडी गावठाण बसथांब्याच्या दिशेने भरधाव निघतात. त्यामुळे अनेक पादचारी नागरिक रस्ता ओलांडताना बिचकतात. या चौकातील अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच हा चौक गजबजलेला असतो. पीएमपी वाहनांकडून अशा प्रकारे सिग्नलचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पवळे उड्डाणपुलाखालील चौक, खंडोबा माळ, मोरवाडी चौक, कासारवाडी या चौकांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांकडूनही या बसगाड्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. शासकीय वाहनेच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करीत असतात. त्यामुळे दुचाकी आणि इतर मोठी वाहनेही त्यांच्यापाठोपाठ सिग्नल तोडत असतात. विशेषत: रात्रीच्या वेळी फेऱ्या संपवण्याच्या घाईने बसचालक वेगात बस चालवतात. सिग्नलही पाळले जात नाहीत. यामुळे इतर वाहनचालक बिचकतात. फेऱ्या कोण आधी संपवतो, यावरून या बसचालकांमध्ये स्पर्धा लागते. मात्र यामुळे प्रवासी आणि इतर वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो. लाल दिवा लागला असतानाही रिक्षाचालक पाठीमागून जोरजोरात हॉर्न वाजवत राहतात. (वार्ताहर)