शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यालयात शुकशुकाट

By admin | Updated: June 4, 2016 17:03 IST

महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची वार्ता येताच जळगावमधील भाजपाच्या बळीराम पेठेतील जिल्हा कार्यालयात शुकशुकाट पसरला.

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.०४ - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची वार्ता येताच भाजपाच्या बळीराम पेठेतील जिल्हा कार्यालयात शुकशुकाट होता.  दुसरीकडे शिवराम नगरातील खडसे यांच्या निवासस्थानी सुरूवातीस शांतता होती मात्र 12.33 वाजता खडसे यांच्या कन्या जिल्हा बॅँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचे या ठिकाणी आगमन झाले. 
सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान, मुंबईतील राजकीय घडामोडींचे पडसाद हळू हळू शहरात उमटताना दिसत होते. 
 
जिल्हा भाजपा कार्यालय
दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हा भाजपा कार्यालयात कार्यकत्र्याची फारशी गर्दी नव्हती. महानगर जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह सात ते आठ कार्यकर्ते कार्यालयात होते. यानंतर 12.15 वाजेच्या दरम्यान नगरसेवक विजय गेही हे येथे आले. 
वाहिन्यांचे प्रतिनिधी दाखल
भाजपा जिल्हा कार्यालयाच्या आवाराचे चित्रीकरण करण्यासाठी काही वाहिन्यांचे प्रतिनिधीही तातडीने दाखल झाले होते. 
मुक्ताई बंगल्यावर गर्दी वाढू लागली
खडसे यांच्या निवासस्थानी 12 वाजेच्या सुमारास प्रथम बंदोबस्तासाठीचा एक कॉस्टेबल व घरातील कर्मचारी वर्ग होता. 12.33 वाजेच्या सुमारास जिल्हा बॅँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर या शिवराम नगरातील निवासस्थानी आल्या. त्यांच्या समवेत प्रांजल खेवलकर हेदेखील होते. त्या पाठोपाठ माजी महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस दीपक फालक हेदेखील या ठिकाणी आले. हळू,हळू या ठिकाणी गर्दी वाढत होती. 
मुक्ताईनगरात बंद
खडसेंचा मतदार संघ असलेल्या  मुक्ताईनगर, कोथळीत कार्यकत्र्यानी एकत्र येऊन बंदचे आवाहन करण्यास सुरूवात केली आहे. त्याला प्रतिसाद मिळाला.