शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या पुढाकाराने शिरसोलीत दिव्यांगांचे शुभमंगल

By admin | Updated: July 16, 2017 07:59 IST

समाजाने पुढाकार घेतल्यास काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरसोली (ता.जळगाव) येथील मूकबधिर नीलेश व तोंडापूर (ता.जामनेर) येथील अपंग पुष्पा यांचा विवाह सोहळा होय.

शालिग्राम पवार/ऑनलाइन लोकमतशिरसोली, दि. 16 - सुज्ञ नागरिक व समाजाने पुढाकार घेतल्यास काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरसोली (ता.जळगाव) येथील मूकबधिर नीलेश व तोंडापूर (ता.जामनेर) येथील अपंग पुष्पा यांचा विवाह सोहळा होय. या दोघांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेत या दोघांचे लग्न जुळविले आणि १६ जुलै रोजी विवाह सोहळा शिरसोली येथील पाच देवी मंदिरावर मोठ्या उत्साहात होत आहे. मूकबधीर असलेल्या नीलेश याचे वडील तुळशीराम पाटील यांचे निधन झाले आहे. नीलेश हा जैन इरिगेशन या कंपनीत कार्यरत आहे. सोज्वळ स्वभावामुळे तो सर्वांचाच लाडका आहे. कुणाच्याही सुख-दु:खात तो सहभागी होत असतो. मात्र मूकबधिर असल्याने त्याच्या विवाहाची सर्वांनाच चिंता होती. वधूचा शोध सुरू होता. तोंडापूर येथील भाऊराव पाटील यांची कन्या पुष्पा व नीलेशबाबत प्रतिष्ठित नागरिकांनी बोलणी केली व त्यांना त्यात यश आले. दोघांच्या विवाहास मंडळी राजी झाली आणि १६ जुलै रोजी विवाह सोहळा निश्चित झाला. नीलेशचा विवाह होणार असल्याने ग्रामस्थांना आनंद झाला आहे. त्यामुळे हा सोहळा मोठ्या थाटात करण्यात येणार आहे. शिरसोली, तोंडापूर येथील तसेच जळगावातील प्रतिष्ठित मंडळीही या सोहळ्यात सहभागी होणार असून,  दोघांना आशीर्वाद देणार आहेत.