शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीसूर्या’ घोटाळय़ातील एजंटचे वासनकर समूहाशी लागेबांधे

By admin | Updated: May 12, 2014 00:20 IST

अकोला येथील आरोपी एजंटचे ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक

अकोला: श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या घोटाळ्यातील अकोला येथील आरोपी एजंटचे ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणार्‍या नागपूर येथील वासनकर समूहाशी लागेबांधे असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या एजंटने सुरुवातीला ह्यश्रीसूर्याह्णच्या गुंतवणूकदारांना वासनकर समूहामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, वासनकर समूहाची मेंबरशिप आणि शेअरची किंमत ह्यश्रीसूर्याह्णपेक्षा जास्त होती. त्यामुळे हे एजंट गुंतवणूकदारांना वासनकर समूहाऐवजी ह्यश्रीसूर्याह्णमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत होते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. वासनकर समूहाच्या मालकांसह ९ जणांविरुद्ध नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गुन्हा दाखल केल्यानंतर समूहाचे अकोल्यातील गुंतवणूकदार हादरले आहेत. नागपूर येथील श्रीसूर्या कंपनीचा मुख्य प्रवर्तक समीर जोशी, पल्लवी जोशी यांनी अकोल्यात येऊन गुंतवणूकदारांचा मेळावा घेतला होता. मेळावा घेण्यासाठी जोशी दाम्पत्याला अकोल्यातील एजंटांनी मदत केली होती. सुरुवातीला गुंतवणूकदारांना काही रकमेचे धनादेश मिळाले; परंतु नंतर धनादेश मिळणे बंद झाले आणि श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा भंडाफोड झाला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात जोशी दाम्पत्य, मोहन मुकुंद पितळे, मंगेशी पितळे, मुकुंद पितळे (रा. अकोला), अमरावतीचा शंतनू कुर्‍हेकर, चंद्रशेखर कुर्‍हेकर, आनंद जहागीरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ह्यश्रीसूर्याह्ण आणि नागपूर येथील वासनकर समूहाने गुंतवणूकदारांना दाम दुपटीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. ठेवी गोळा करण्यासाठी दोन्ही कंपनीने स्वतंत्ररीत्या एजंटांची नियुक्ती केली. काही एजंट तर दोन्ही कंपनींसाठी काम करत. हे एजंट ठेवीदारांना दोन्ही कंपनींच्या योजनांची माहिती देत होते. ठेवीदाराची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन एजंट त्यांना योजना सांगत असत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजंट वासनकर समूहाची मेंबरशिप आणि शेअरची किंमत एक लाख रुपये सांगत होते. मात्र, गुंतवणूकदार मेंबरशिपसाठी एक लाख रुपये देण्यास तयार नसल्यास एजंट त्याला कमी किंमत असलेल्या श्रीसूर्या कंपनीची योजना सांगत असे. कोणत्याही परिस्थितीत हे एजंट गुंतवणूकदारांना सापळ्यात अडकवतच होते.