शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा वर्गमित्र दाखवा, दोन लाख रुपये मिळवा

By admin | Updated: June 17, 2016 03:04 IST

महाविद्यालयातून पदवी घेतल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक तरी महाविद्यालयीन वर्गमित्र दाखवावा, आपण त्यास दोन लाख रुपये तत्काळ देऊ, असे खुले आव्हान

आर्णी (यवतमाळ) : महाविद्यालयातून पदवी घेतल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक तरी महाविद्यालयीन वर्गमित्र दाखवावा, आपण त्यास दोन लाख रुपये तत्काळ देऊ, असे खुले आव्हान अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी दिले.लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित केले होते. आता मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच दाभडी गावाच्या वाटेवर आर्णी येथे काँग्रेसने गुरुवारी ‘चाय की चर्चा’ हे प्रतीकात्मक आंदोलन केले, तेव्हा दिग्विजय सिंह बोलत होते. ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे, तेच मोदी करीत असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली. या देशाला खोटे बोलणारा पंतप्रधान नको आहे, त्याऐवजी कमी शिकलेला पंतप्रधान असला, तरी चालेल. ‘मोदी स्वत:ला चहाविक्रेता संबोधतात, परंतु मुळात त्यांनी चहा कधी विकलाच नाही. त्यांच्याकडून चहा विकत घेऊन प्यायलेला असा एक तरी इसम दाखवावा, आपण त्यालाही दोन लाख रुपये देऊ, असेही दिग्विजय सिंह म्हणाले. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरींदरसिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, खासदार राज बब्बर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम प्रामुख्याने उपस्थित होते. बैलगाडीतून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी काळा चहा पिऊन मोदी सरकारचा निषेध नोंदविला. (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या ‘चाय की चर्चा’ कार्यक्रमामध्ये भाजपानेही काँग्रेसच्या विरोधात पत्रकबाजी केली. त्यात आदर्श घोटाळा, घरकुल घोटाळा, निम्न पैनगंगा धरणासाठी ३०० कोटी खर्च करूनही सिंचन का झाले नाही, या मुद्द्यांचा समावेश होता. मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांचे फलक आर्णीत भाजपाकडून लावण्यात आले.