शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दहशत झुगारून ‘व्हॅलेंटाईन’चा जल्लोष!

By admin | Updated: February 15, 2015 00:48 IST

व्हॅलेन्टाईन डे’ हा प्रेमाचा दिवस़ प्रेम हे जसे शाश्वत आहे तसेच ते सार्वत्रिकही आहे़ त्याला पूर्व वा पश्चिमच्या संस्कृतीत विभागता येत नाही़

नागपूर : ‘व्हॅलेन्टाईन डे’ हा प्रेमाचा दिवस़ प्रेम हे जसे शाश्वत आहे तसेच ते सार्वत्रिकही आहे़ त्याला पूर्व वा पश्चिमच्या संस्कृतीत विभागता येत नाही़ परंतु शहरातील संस्कृतीरक्षणाचा ठेका घेणाऱ्यांना ही गोष्ट मान्य नाही़ म्हणूनच या ‘पराक्रमी पुरुषांनी’ शुक्रवारी गुंडगिरी करत प्रेमीयुगुलांना धमकावून पाहिले. असे केल्याने आजच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ला कुणीही घराबाहेर पडणार नाही, असा त्यांचा होरा होता. परंतु तरुणाईने या कथित संस्कृतीरक्षकांची दहशत झुगारून प्रेमाचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. त्यांच्या या आनंदावर विरजण पडू नये म्हणून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रसिद्ध उद्यान व सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांचा खडा पहारा होता़ अनेकांनी कुटुंबींयासोबत ह्यव्हॅलेन्टाईन डेह्णचा आनंद लुटला. शिवसेनेच्या कथित कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीवर चौफेर टीका झाल्याने व यांच्यातील काहींना पोलिसांनी अटक केल्याने शनिवारी पुन्हा कुणी असा उपद्व्याप करण्याची हिंमत केली नाही़ काही प्रेमीयुगुलांनी एकांतात भेटण्याचे टाळले मात्र मित्रांच्या ग्रुपसोबत त्यांची धम्माल सुरूच होती. (प्रतिनिधी)च्ह्यव्हॅलेंटाईन डेह्णच्या पूर्वसंध्येला काही शिवसैनिकांनी फुटाळा, बॉटनिकल गार्डन, अंबाझरी उद्यान आदी भागात प्रेमीयुगुलांना पिटाळून लावले होते. विशेष म्हणजे ह्यव्हॅलेंटाईन डेह्णला विरोध करण्याची पक्षाची भूमिका नसतानाही स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा धुडगूस घातल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गंभीर दखल घेतली. शुक्रवारी रात्रीच यासंदर्भात शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख व आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घटनेची माहिती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या धोरणाविरुद्ध हे कृत्य असल्याने संबंधित कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. च्दरम्यान, शनिवारी पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. प्रेमीयुगुलांना पिटाळणाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरले, असे जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी सांगितले. झालेली घटना दुर्दैवी आहे. यासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार हे पक्ष प्रमुखांना आहे. तेच याबाबत निर्णय घेतील, घटनेची माहिती नेत्यांना दिली आहे, असे हरडे यांनी स्पष्ट केले.गार्डन झाले पोलीस छावणी सातपुडा वनस्पती उद्यान म्हणजेच ‘बॉटनिकल गार्डन’ येथेच शुक्रवारी तथाकथित संस्कृती रक्षणकर्त्यांनी हैदोस घातला होता. त्यामुळे पोलिसांचा सर्वाधिक बंदोबस्त बॉटनिकल गार्डनमध्येच होता. उद्यानाच्या मुख्य गेटवरच जवळपास १० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यानंतर उद्यानामध्ये सुद्धा पोलीस तैनात होते. त्यामुळे हैदोस घालणारे तरुण या उद्यानाकडे आज फिरकलेच नाही. मात्र अशा भीतीयुक्त वातावरणातही काही प्रेमीयुगुलांनी उद्यानात जाऊन प्रेम दिवस साजरा केलाच, पण संख्या मात्र नेहमीपेक्षा खूप कमी होती. च्नागपूर : ह्यव्हॅलेंटाईन डेह्ण ला विरोध करणाऱ्या राडेबाज शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. याबाबत अंतिम निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.