शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी रास्त भाव दुकानदारांची शिधापत्रिकाधारकांना विनवणी!

By admin | Updated: October 14, 2016 02:35 IST

जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी अकोला जिल्हय़ात अभिनव उपक्रम

संतोष येलकरअकोला, दि. १३- जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांकडून जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना शौचालय बांधण्यासाठी आग्रही विनवणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २0१७-१८ पर्यंत अकोला जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी सन २0१६-१७ मध्ये ४३ हजार ३६५ कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला शहरात १0 हजार ७00 आणि जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामीण भागात ३२ हजार ६६५ कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आता जिल्हय़ातील रास्त भाव दुकानदारांचा सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गत ५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्य व रॉकेलसाठी रास्त भाव दुकानांमध्ये येणार्‍या शिधापत्रिकाधारकांना येत्या डिसेंबर अखेरपर्यंत शौचालय बांधण्याचा आग्रह रास्त भाव दुकानदारांकडून करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात १ हजार ५२ रास्त भाव दुकाने असून, संबंधित रास्त भाव दुकानदारांकडून शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना शौचालय बांधकामासाठी विनवणी करण्यात येत आहे.-सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ातील रास्त दुकानात येणार्‍या शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानदारांकडून डिसेंबर अखेरपर्यंत शौचालय बांधण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे.-अनिल टाकसाळेजिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.