शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

५00 एसी बसेस बनणार ‘शिवशाही’

By admin | Updated: December 8, 2015 01:19 IST

सटीकडून भाडेतत्त्वावर सुरुवातीला ५00 एसी व स्लीपर एसी बसेस घेण्यात येणार असून, त्या ताफ्यात येण्यापूर्वीच त्याचे ‘शिवशाही’ नावाने नामकरण केले आहे.

मुंबई : एसटीकडून भाडेतत्त्वावर सुरुवातीला ५00 एसी व स्लीपर एसी बसेस घेण्यात येणार असून, त्या ताफ्यात येण्यापूर्वीच त्याचे ‘शिवशाही’ नावाने नामकरण केले आहे. या बसेसची रंगसंगती, आराखडा ठरविण्याकरिता ‘शिवशाही’ रंगसंगती स्पर्धाही आयोजित केली असून, स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस या दोन सेवा प्रकारांचा समावेश आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. १0 डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून, रंगसंगती, आराखडा पाठविण्याची अंतिम मुदत १६ डिसेंबर आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिकासाठी ५ लाख, द्वितीय पारितोषिकासाठी ३ लाख आणि तृतीय पारितोषिकासाठी २ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धकांना बक्षीस दिल्यानंतर आराखडा, रेखाचित्रे यांची मालकी एसटी महामंडळाची राहणार आहे. त्यावर विजेत्याला कोणताही अधिकार राहणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता असताना त्या वेळी एसटी महामंडळाकडून लाल डब्याचा रंग बदलण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली आणि या स्पर्धेनंतर बसेसना नारिंगी रंग देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांपूर्वी ‘अश्वमेध’ या कोट्यवधी रुपयांच्या एसी बसची रंगसंगती ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा घेतल्यानंतर बसची रंगसंगती निश्चित करण्यात आली. या दोन्ही स्पर्धांनंतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस मिळाले नाही, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)