शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गुजराती मतदारांसाठी शिवसेनेची फिल्डिंग

By admin | Updated: October 17, 2016 01:48 IST

महापालिका निवडणुकीत आपले परंपरागत मतदार कायम ठेवतानाच, अन्य समाजघटकांनाही आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत आपले परंपरागत मतदार कायम ठेवतानाच, अन्य समाजघटकांनाही आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात मराठी अस्मितेचा नारा देणाऱ्या शिवसेनेनेही मराठी मतदारांखेरीज अन्य भाषिक गटांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील गुजराती चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालविला आहे. शिवसेनेच्या पक्ष संघटनेत शाखाप्रमुखाला कायमच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. शाखा आणि शाखाप्रमुखांच्या जोरावरच शिवसेनेने स्थानिक पातळीवर आपले मजबूत जाळे विणले आहे. मराठी आणि हिंदू अस्मितेचे राजकारण करतानाही स्थानिक गरजेपोटी शिवसेनेने आतापर्यंत मुस्लीम, उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्यांना पक्ष संघटनेत सामावून घेतल्याची उदाहरणे आहेत. यात आता गुजराती चेहऱ्यांची भर पडली आहे. पश्चिम उपनगरात, विशेषत: बोरीवली, कांदिवली, मालाडसारख्या भागांत गुजराती मतदारांची संख्या मोठी असल्याने, इथे गुजराती चेहरे देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कांदिवली येथे उदय रुगानी यांच्या रूपाने गुजराती शाखाप्रमुख नेमला असून, त्यांच्याकडे वॉर्ड क्रमांक २०ची जबाबदारी देण्यात आली आहे, तर विकास शाह, जयेश मेहता यांच्याकडे वॉर्ड समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. युतीच्या जागावाटपामुळेच आतापर्यंत गुजरातीबहुल भागात शिवसेनेने निवडणूक लढविली नाही. त्यामुळे गुजराती समाज भाजपाकडे असल्याचा लोकांचा समज आहे. मात्र, शिवसेनेलाही या समाजातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडले आहोत. गुजरातीबहुल भागातून सेनेने उमेदवार दिल्यास, त्यालाही नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा गुजराती नेत्यांनी केला. केवळ गुजरातीच नव्हे, तर मारवाडी, उत्तर भारतीय आणि मुस्लीम समाजातील लोकही शिवसेनेशी जोडले गेले आहेत. शिवसेनेतील त्यांचे काम आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेत, या सर्व समाजातील लोकांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शाखाप्रमुख तर काही ठिकाणी वॉर्ड समन्वयक म्हणून विविध समाजातील लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजराती चेहऱ्यांमुळे नवीन मतदार जोडण्यासोबतच, भाजपाच्या परंपरागत व्होट बँकेला धक्का देणे शक्य होणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)