शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या राजीनाम्याची शिवसेनेची मागणी

By admin | Updated: November 28, 2014 02:03 IST

महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांना दिली.

मुंबई :  दुष्काळाने होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी  त्यांचा अपमान करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांना दिली.
  बिल भरणा-या शेतक-यांनी वीज बिलही भरायले हवे, असे वक्तव्य महसूल मंत्री खडसे यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य शेतक-यांच्या भावना दुखावणारे आणि अपमान करणारे आहे.  त्यामुळे खडसेंनी नैतिकदृष्टय़ा राजीनामा द्यायला हवा अशी  मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचे शिवसेना नेते  कदम म्हणाले.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. यावेळी बोलताना राज्यपालांनी दुष्काळी भागाचा दौरा करण्याचे आश्वासन देतानाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले.  
 भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम यांनी खडसेंवर टीका करत राज्यपालांकडे  त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
 
गांभीर्याने घेण्याजोगे नाही- खडसे
रामदास कदम हे गांभीर्याने घेण्याजोगे नेते नाहीत. त्यामुळे आपला राजीनामा मागण्या इतके कदम मोठे नेते नाहीत, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.