शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे मंत्रिमंडळातील चेहरे बदलणार

By admin | Updated: April 2, 2017 12:58 IST

राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 -  राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांशी फोनवरून चर्चा करून मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सेनेचे मंत्री बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पक्षप्रमुखांनी सध्यातरी सबुरीने घेण्याचे  आवाहन केले आहे.
 शिवसेनेच्या मंत्र्याबाबत सेना आमदारांबाबत नाराजी आहे. सरकारमधील भूमिकेबाबत सेनेचे मंत्री आणि आमदारांमध्ये मतमतांतर वारंवार दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच सेनेच्या आमदारांनी एका बैठकीत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते. जनतेकडून कर्जमाफीबाबत विचारणा होत आहे. जनतेने आमदारांचे कपडे काढणेच बाकी राहिले आहे, अशा शेलक्या शब्दात सेनेच्या आमदारांनी मंत्र्यांबाबत संताप व्यक्त केला होता. 
 काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली.  यावेळी पक्षबांधणी, केंद्रातील भूमिका, मतदारसंघातील कामे आणि पुढच्या निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी याबाबत  चर्चा झाली होती. दरम्यान, पक्षप्रमुखांनी मंत्रिमंडळातील सेनेचे चेहरे बदलण्याचा निर्णय घेतल्यास कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.