शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अणेंच्या पदमुक्तीवर शिवसेना ठाम

By admin | Updated: December 18, 2015 02:42 IST

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात भूमिका मांडली. परंतु यातून स्पष्ट

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात भूमिका मांडली. परंतु यातून स्पष्ट खुलासा न झाल्याचे सांगत अणे यांना पदमुक्त करण्याचा मुद्दा सदस्य शरद रणपिसे व संजय दत्त यांनी गुरु वारी विधान परिषदेत औचित्याद्वारे उपस्थित केला. विरोधी सदस्यांनीही यावर आग्रही भूमिका मांडली तर जोपर्यंत अणेंना पदमुक्त करणार नाही तोपर्यत सभागृहात व सभागृहाबाहेर शिवसेनेचा विरोध कायम राहणार असल्याचे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. ८ डिसेंबरपासून औचित्याद्वारे अणे यांच्या पदमुक्तीचा मुद्दा उपस्थित करीत आहोत. परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट खुलासा केला नसल्याचे मत रणपिसे यांनी मांडले. मुंबईसाठी १०६ हुतात्मे झाले हे थोतांड असल्याचे अणे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. अशी हिंमत महाधिवक्ता करीत आहे. याचा खुलासा झाला नसल्याचे शेकापचे जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे महाधिवक्ता वागत असले तर हे संयुक्तिक नसल्याचे जनार्दन चांदूरकर यांनी सांगितले. विधिमंडळाचे दोन्ही सभागृह सार्वभौम आहे. त्यामुळे अणे यांच्यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री व्यक्तिगत प्रामाणिक आहेत. परंतु महाधिवता यांच्यासंदर्भात मात्र तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, अशी त्यांची भूमिका असल्याचे मत नीलम गोऱ्हे यांनी मांडले. महाधिवक्ता हुतात्म्यांचा अपमान करीत असताना सदस्य हतबल असेल तर या सभागृहाचा काय उपयोग असे हेमंत टकले म्हणाले. न्यायालयात मागासवर्गीयांची अनेक प्रकरणे आहेत. अणे मागासवर्गीयांच्या बाजूने भूमिका मांडण्याची शक्यता नसल्याने मागासवर्गीयांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केला. अणे यांच्या मुद्यावरून शिवसेना व विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला.(प्रतिनिधी)