शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला खेड, जुन्नर

By admin | Updated: March 15, 2017 00:27 IST

पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत जुन्नर व खेड तालुक्यात शिवसेनेला काँग्रेसने ‘हात’ दिला असून येथे उपसभापतीपद पदरात पाडले आहे

पुणे : पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत जुन्नर व खेड तालुक्यात शिवसेनेला काँग्रेसने ‘हात’ दिला असून येथे उपसभापतीपद पदरात पाडले आहे. तर १३ पैैकी सात पंचायत समितीवर राष्ट्रवादीने दोन्ही पदांवर वर्चस्व मिळवले आहे. दोन ठिकाणी काँग्रेसचे, तीन ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी भाजपाचे सभापती झाले आहेत. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत बहुमत मिळवले. ७५ पैैकी ४४ जागा मिळवल्या, तर आंबेगाव, बारामती, भोर, दौैंड, शिरूर, मुळशी या पंचायत समित्यांत बहुमत मिळवले होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही पदे मिळवता आली आहेत. तसेच पूर्ण बहुमत न मिळालेल्या वेलीत सभापती व उपसभापतीही राष्ट्रवादीचे झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हवेली पंचायत समितीत २६ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाचे ६, तर शिवसेनेचे ५ व २ अपक्ष असे पक्षीय बलाबल झाले होते. त्रिशंकू अवस्थेत बाजी मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकाची साथ मिळणे आवश्यक होते. ती कमतरता लोणी काळभोर गणातून अपक्ष निवडून आलेले उमेदवार युगंधर उर्फ सनी काळभोर यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच हवेलीचे सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेत त्यांना जागा मिळवण्यात अपयश आले होते. मात्र पंचायत समितीवर त्यांचे वर्चस्व राखले होते. आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीतही त्यांनी आपले वर्चस्व राखले आहे. तसेच वेल्हा तालुक्यात काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे.