शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना बॅकफूटवर

By admin | Updated: August 12, 2014 03:07 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर असलेले मतभेद संपवत, भाजपा-शिवसेनेने दिलजमाईचे संकेत दिले आहेत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर असलेले मतभेद संपवत, भाजपा-शिवसेनेने दिलजमाईचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने बॅकफूटवर जात, या पदासाठी जाहीरपणे हक्क न सांगता मौन पाळले आहे.विधानसभेच्या २८८ पैकी जास्तीतजास्त जागांवर दावा सांगण्यावरून अलीकडेच या दोन पक्षांतील मतभेद ताणले गेले होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुका होत असलेल्या चार राज्यांमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री असेल असे शनिवारी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केल्यानंतर, शिवसेनेने गेल्या दोन दिवसांपासून या मुद्यावर मौन पाळत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.१४४ पेक्षा एकही जागा कमी नाही आणि मुख्यमंत्रिपदही देणार नाही, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेने घेतली होती. उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू संजय राऊत यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी नुकतीच मोदींची दोनदा भेट घेतली. या भेटीत नेमके काय शिजले ते कळू शकले नाही. मात्र भविष्यात दोन्ही पक्षांनी वादग्रस्त विधाने करू नये, यावर सहमती झाल्याचे कळते. नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढविण्याऐवजी राज्याच्या राजकारणात राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. पंकजा यांनी विधानसभा निवडणूक लढविली तर भाजपाला मुंडे यांचा बदली उमेदवार देणे अवघड काम ठरणार आहे. शहांनी चार राज्यांमधील निवडणूक प्रचाराची आखणी चालविली आहे.