शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा राज्यकारभार जगात सर्वोत्तम

By admin | Updated: February 20, 2017 03:55 IST

आदर्श राज्यकारभाराचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार. छत्रपती शिवराय जनतेचे राजे

जुन्नर : आदर्श राज्यकारभाराचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार. छत्रपती शिवराय जनतेचे राजे होते. सर्व जाती-धर्माला न्याय देणारे, रयतेवरील अन्याय दूर करणारे लोकशासन शिवरायांनी दिले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर काढले. छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मस्थळात पारंपरिक पाळणा हलवून शिवजन्म सोहळा झाला. या सोहळ्यासाठी शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली होती. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संभाजीराजे भोसले, आमदार विनायक मेटे, आमदार शरद सोनवणे, जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुंजीर, विठ्ठल जाधव, मारुती सातपुते, तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, माजी अध्यक्ष राजेंद्र बुट्टे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते. राज्यातील दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. राज्यातील ५ किल्ले शासनाने मॉडेल फोर्ट बनविण्याचे आवाहन करीत राज्यातील किल्ले संवर्धनासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करण्याचा मनोदय खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला. अखेर हेलिकॉप्टर किल्ले शिवनेरीवर उतरविले  जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानने किल्ले शिवनेरी हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याने राज्य पुरातत्त्व विभागाने हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी नाकारण्याचे पत्र दिले होते. अखेरीस पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर किल्ले शिवनेरीवर उतरविले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिगणाच्या स्वागताची संधी ठाकरवाडी तेजूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या ढोल लेझीम पथकाला मिळाली. यामुळे आदिवासी ठाकर समाजातील ही चिमणी पाखरे हरखून गेली होती. आमदार शरद सोनवणेंचे राजीनामानाट्य राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारणार नसल्याचे सांगितले. हजारो शिवप्रेमी पायथ्याशी खोळंबलेशिवजयंती सोहळ्यासाठी शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणासाठी प्रवेशाचे पास काढण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे प्रवेशपास नसलेले हजारो शिवप्रेमी किल्ल्याच्या पायथ्याशी खोळंबून बसले होते. मुख्यमंत्र्यांचे प्रस्थान झाल्यानंतर शिवप्रेमींना गडावर सोडण्यात आले. किल्ले शिवनेरीवर शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमी युवकांची रात्रीपासून मोठी गर्दी होती. त्यांचे स्वागत जुन्नर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.