शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या नावाचे शिवाजी विद्यापीठाला वावडे

By admin | Updated: July 21, 2015 01:36 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागावा, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागावा, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून शिवाजी विद्यापीठ परिसरातून काढण्यात येणाऱ्या ‘मॉर्निंग वॉक’मुळे विद्यापीठाची बदनामी होते, अशी हरकत विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी सुरक्षा रक्षकांना पुढे करून हा ‘मॉर्निंग वॉक’ रोखण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारामुळे सकाळी एनसीसी भवन येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर तणाव निर्माण झाला.पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले. त्या दिवसाची स्मृती कायम राहावी व मारेकऱ्यांचा शोध लागावा, या उद्देशाने दर महिन्याच्या २० तारखेला सकाळी साडेसहा वाजता पानसरे यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणाहून हा ‘मॉर्निंग वॉक’ काढला जातो. कोणतीही घोषणाबाजी नाही, की निदर्शने नाहीत, अगदी शांतपणे या ‘मॉर्निंग वॉक’चे आयोजन केले जाते. माध्यमांतून ‘शिवाजी विद्यापीठातून मॉर्निंग वॉक काढण्यात आला,’ असा उल्लेख आल्याने विद्यापीठांची बदनामी होते. फेरी काढा परंतु त्यावेळी फलक नकोत व त्याच्या वृत्तपत्रांत बातम्या येताना विद्यापीठाचा उल्लेख येऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते.सोमवारी सकाळी सात वाजता पानसरे यांच्या घरापासून या ‘मॉर्निंग वॉक’ला सुरुवात झाली. शिवाजी विद्यापाठातील एनसीसी भवनजवळील प्रवेशद्वाराजवळ मॉर्निंग वॉकमधील नागरिकांना सुरक्षा रक्षकांनी रोखून धरले. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी परवानगी घेतली आहे का?, हातामधील फलक बाजूला ठेवा, अशी विनंती सुरक्षा रक्षकांनी केली. दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांनी पुढे येऊन कसली परवानगी, कोणते फलक बाजूला ठेवा, अशी विचारणा करत, आम्ही काही आंदोलनासाठी आलेलो नाही, आम्ही शांतपणे मॉर्निंग वॉक काढत आहे. सर्व विचारांचे लोक यामध्ये सहभागी आहेत. अकारण कोणत्या गोष्टीला विरोध करू नका, अशी ठाम भूमिका घेतली. (प्रतिनिधी)