शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदी शिवाजीराव नाईक की सदाभाऊ?

By admin | Updated: November 11, 2015 00:14 IST

जिल्ह्याला लाल दिवा शक्य : बिहारच्या निकालाचा भाजपवर परिणाम

अशोक पाटील -- इस्लामपूर -बिहारच्या निकालाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर होऊ नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीला मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सोमवारी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता मंत्रिपदाची लॉटरी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लागणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजप सावध झाला आहे. जिल्ह्यात शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि विलासराव जगताप हे भाजपचे आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. नाईक यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. याला वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी नाईक यांच्या पदरात पद पडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना भाजपची कोअर कमिटी आतही येऊ देत नसल्याने या दोघांनीही आता उसाच्या एफआरपीसाठी लढा सुरू केला आहे.आघाडी शासनाच्या काळात सांगली जिल्ह्यात तीन मंत्रिपदे होती. मात्र युती शासनाने गेल्या वर्षभरात सांगलीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पण आता बिहारमधील पराभवाचे पडसाद दक्षिण महाराष्ट्रावर पडू नयेत, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसू नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपदाचे वेध लागले आहे. मात्र शिवाजीराव नाईक आणि सदाभाऊ खोत हेच प्रबळ दावेदार मानले जातात.