शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शिवसेनेचा राडा!

By admin | Updated: February 14, 2015 04:00 IST

‘व्हॅलेन्टाइन्स डे’ला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी उपराजधानीत अनेक ठिकाणी गुंडगिरी करीत तरुण-तरुणींना शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला़

नागपूर : ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी उपराजधानीत अनेक ठिकाणी गुंडगिरी करीत तरुण-तरुणींना शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला़ संस्कृती रक्षणाच्या नावाखाली शिवसैनिकांनी सायंकाळी फुटाळा, बॉटनिकल गार्डन, अंबाझरी उद्यान तसेच रस्त्यांवर अक्षरश: धिंगाणा घालत काही तरुणींचा विनयभंग केला, शिवीगाळ केली, स्कार्फ ओढला अन् तरुणांनाही मारहाण केली. या घटनेमुळे तरुणाईमध्ये प्रचंड संतापाची भावना असून,सर्वत्र गुंडगिरीचा निषेध होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. ‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी ६० हून अधिक शिवसैनिक फुटाळा परिसरात एकत्र आले. ‘बॉटनिकल गार्डन’मध्ये शिरले अन् तेथे असलेल्या युगुलांमध्ये पळापळ सुरू झाली. त्यांनी काही जणांना घेरले अन् मुला-मुलींना चेहऱ्यावरून ‘स्कार्फ’ बाजूला करण्याचे फर्मान सोडले. एका तरुणीचा ‘स्कार्फ’ काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यानंतर त्यांचे छायाचित्रदेखील काढण्यात आले. काही युगुलांना उठाबशा काढायला लावल्या. अंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे गोंधळ घालत सहज बोलत बसलेल्या काहीजणांना कान पकडायला लावले. मिळेल ते जोडपं किंवा अगदी मुलगी एकटी असेल तरी त्यांना घेरून व अक्षरश: त्यांना अडवून या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकाणी नागपूरक रांनी सुद्धा निषेध व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)