शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

वेगळ्या विदर्भावर भाजपाला घेरण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी युती

By admin | Updated: August 2, 2016 15:13 IST

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर मित्रपक्ष शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजापाची कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं दिसतं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेनेदेखील भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. आणि आता तर मित्रपक्ष शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजापाची कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं दिसतं आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करुन चर्चादेखील केली. त्यामुळे शिवसेना आता कोणती नवी खेळी खेळत आहे याकडे भाजपासाह विरोधकांचंही लक्ष लागलं आहे. 
 
फोनवर झालेल्या चर्चेनुसार वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री  थेट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचं ठरलं होतं. त्यानुसार विधानभवनात रामदास कदम यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीत रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत. 
 
वेगळ्या विदर्भाला समर्थन करणा-या भाजपाविरोधात सर्वपक्षीय एकजूट झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपण अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे विधानभवनातून थेट मातोश्रीकडे रवाना झाले होते. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेने रणनीती ठरवली.
 
वेगळ्या विदर्भावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय भुमिका घ्यावी ? याबाबत गोंधळलेला दिसत आहे.  राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अधिवेशनात भाजपाला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर धारेवर धरलं असताना केंद्रातील नेते मात्र वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आपण असल्याचं सांगत आहे. यामुळे वेगळ्या विदर्भाऐवजी राष्ट्रवादीचे नेतेच वेगळे झाले असल्याचं दिसत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. मात्र ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमचा वेगळ्या विदर्भाला विरोध नसल्याचं सांगितलं आहे.