शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भाजपावर शिवसेना शिरजोर

By admin | Updated: September 18, 2016 02:39 IST

शिवसेना-भाजपामध्ये नव्या प्रकल्पांच्या घोषणांवरून आणि झालेल्या प्रकल्पांच्या कामांचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरून रस्सीखेच सुरू झाली

अजित मांडके,

ठाणे- काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपामध्ये नव्या प्रकल्पांच्या घोषणांवरून आणि झालेल्या प्रकल्पांच्या कामांचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच सध्या भाजपामध्ये इनकमिंग वाढू लागल्याने त्याचा धसकादेखील शिवसेनेने घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पालिकेने अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. या कामांवरील खर्चाचे नियोजनही या बैठकीत झाले होते. यात तीनहातनाका येथे राबवण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, मनोरुग्णालय येथील विस्तारीत रेल्वे स्टेशन, वॉटर फं्रट डेव्हलपमेंट आदी प्रकल्पांवर चर्चा होऊन हे प्रस्ताव मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, या सर्वांचे श्रेय आपल्याला मिळावे, म्हणून शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांना दम भरून या कामांची घोषणा आम्हीच करू, असे सांगितले व तसेच केले. कळवा खाडीपुलावर नवीन उड्डाणपुलाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा पालिका प्रशासन व भाजपाचा प्रयत्न होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्नदेखील हाणून पाडण्यात आला. आता या पुलाचा कोणाच्याही हस्ते शुभारंभ न होता त्याचे काम सुरू झाले आहे.दिव्यातील आंदोलन चिरडले शिवसेनेच्या मुजोरीमुळे संतापलेल्या भाजपाने तीन दिवसांपूर्वी दिव्यातील समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्याकरिता महापालिका मुख्यालयासमोर गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे आंदोलन निश्चित केले होते. दिव्यात सध्या शिवसेनेचे प्राबल्य वाढत असल्याने त्याला सुरुंग लावण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. मात्र, भाजपा कार्यकर्त्यांना अटक करवून शिवसेनेने हे आंदोलन उधळले.भाजपातील इनकमिंगने सेना अस्वस्थ शिवसेनेपेक्षा भाजपामध्ये इनकमिंग वाढल्याने शिवसेना अस्वस्थ आहे. शिवसेना इतर पक्षांतील दिग्गजांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, गृह खाते भाजपाकडे असल्याने वेगवेगळ्या प्रकरणांत अडकलेले अन्य पक्षांतील नेते भाजपाला जवळ करीत आहेत.आयुक्तांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडे त्यांच्या घरी पायधूळ झाडली. या वेळी शिवसेनेच्या मुजोरीला कशी वेसण घालायची, याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.