शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना जिल्हाप्रमुख अटकेत

By admin | Updated: December 8, 2015 00:41 IST

पोलीस कोठडी : नगरसेवक अपहरण प्रकरण, अन्य दोघांनाही अटक

रत्नागिरी : देवरुख नगराध्यक्ष निवडणुकीतील झालेल्या अपहरण नाट्यप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांपासून दूर असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक व अन्य दोघांनी सोमवारी पूर्णगड पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाडिक यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.२६ आॅक्टोबर २०१५ रोजी देवरुख नगरपंचायतीची नगराध्यक्ष निवडणूक होती. मात्र २५ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार नीलेश भुरवणे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रफुल्ल भुवड व भाजपचे देवरुख शहराध्यक्ष कुंदन कुलकर्णी या तिघांचे पूर्णगडमधून अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तत्काळ ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून तत्काळ सूत्रे हलविण्यात आली. पोलिसांनी अपहरण केलेल्या तीनही लोकप्रतिनिधींची सुटका केली. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक मनीष सावंत व मंगेश शिंदे यांना अटक करण्यात आली होती. मात्र याप्रकरणी संशयित असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक (५०, कसबा, संगमेश्वर), संगमेश्वरचे माजी सभापती व नगरसेवक नंदादीप उर्फ बंड्या नंदकुमार बोरूकर (३६, देवरुख) व अजित उर्फ छोट्या गवाणकर (३२, देवरुख) हे पोलिसांची नजर चुकवित होते. त्यांना सोमवारी पूर्णगड पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे साहाय्यक सरकारी अभियोक्ता वर्षा दत्तात्रय प्रभू यांनी काम पाहिले. (वार्ताहर)अटकपूर्व जामीन अर्ज मागेजिल्हा न्यायालयाने राजेंद्र महाडिक यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता. त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला. त्यानंतर पूर्णगड पोलीस ठाण्यात सोमवारी ते हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.महाडिकांची प्रकृ ती बिघडलीन्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत राजेंद्र महाडिक यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची प्रकृ ती बिघडली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत उघडे चार दिवसांपूर्वीच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या पत्रकार परिषदेच्यावेळी देवरुखच्या नगरसेवक अपहरणप्रकरणी उर्वरित संशयितांवर कारवाई कधी करणार, असा सवाल पत्रकारांनी केला होता. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी लवकरच कारवाई होईल, असे सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.