शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीसाठी शिवसेना-भाजपा सकारात्मक

By admin | Updated: October 27, 2016 18:24 IST

काही महिन्यांवर आलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - काही महिन्यांवर आलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या गुरुवारी फोनवरून चर्चा झाली असून, त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्याबाबत दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.  
पक्षविस्तारासाठी भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी होत असलेली मोर्चेबांधणी, तसेच सरकारमध्ये सातत्याने मिळत असलेली दुय्यम वागणूक यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे शिवसेनेने निश्चित केले होते. मात्र तरीही दोन्ही पक्षांनी या निवडणुका एकत्र लढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. 
(शिवसेना-भाजपात युतीचे गुऱ्हाळ) 
(महायुती विस्तारली, जनसुराज्य पक्ष भाजपाचा नवा मित्र)
तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी या चर्चेची माहिती शिवसेना पक्षप्रमुखांना दिली. दरम्यान, शिवसेना आणि भाजपाकडून स्थानिक पातळीवरील युतीबाबत संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच नाही पण शक्य असेल त्या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवण्याच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे.