शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तटकरेंच्या पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश

By admin | Updated: November 7, 2016 06:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. संदीप यांनी रोहा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असून शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते लढणार असल्याने तटकरे यांना आता घरातूनच आव्हान मिळाले आहे. संदीप हे सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरेंचे सुपुत्र आहेत. रविवारी दादर येथील शिवसेना भवनात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. संदीप तटकरेंचा शिवसेना प्रवेश कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. रोहा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी संदीप इच्छुक होते. मात्र, तटकरे यांनी आपले वजन व्याही संतोष पोटफोडे यांच्या पारड्यात टाकून त्यांना पक्षाची उमेदवारी दिल्याने काका-पुतण्यात ठिणगी पडली. संदीप यांनी रोहा नगराध्यक्षपदासाठी शड्डू ठोकल्याने राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान मानले जात आहे.ये तो झांकी है...!केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांनी ‘ये तो बस झांकी है, आगे बहोत कुछ बाकी है’ अशी सूचक प्रतिक्रिया देत शेकापमधील काही पदाधिकारी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. संदीप तटकरे यांच्यामुळे रोहा नगरपालिकेवर सेनेचा भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)