शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाचा मुद्दा ठरणार निर्णायक

By admin | Updated: January 21, 2017 02:55 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी भारतीय जनता पक्षाने चांगलीच मोर्चेबांधणी केली

पूजा दामले, मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी भारतीय जनता पक्षाने चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करुन मराठी मनाचा ठाव घेण्याच्या प्रयत्न भाजपाच्या मात्र अंगलट येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाच्या जागेस मच्छीमारांचा कडाडून विरोध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हाच मुद्दा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच २५ कोटी रुपये खर्च करुन प्रस्तावित शिवस्मारकाचे भूमी व जलपूजन करण्यात आले. अरबी समुद्रात हे स्मारक उभारल्यास मच्छिमारांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम होणार असल्याचे या परिसरातील मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ससून डॉक, कफ परेड, जमशेद या बंदरांमध्ये व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांचा या स्मारकाच्या ठिकाणाला प्रचंड विरोध आहे. महापालिकाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून मुंबईत विविध विषयांवर श्रेय मिळवण्याचे प्रयत्न राजकीय पक्ष करत आहेत. ए वॉर्डमधील प्रभाग २२५ आणि २२६ मध्ये देखील श्रेयासाठी लगबग सुरु झाली आहे. शिवस्मारक हा या प्रभागांमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे. या मुद्द्यावरुन दोन्ही प्रभागात काही प्रमाणात फूट पडली आहे. भाजपला काही ठिकाणी झुकते माप मिळत असले तरी मच्छीमारांचा विरोध त्यांना त्रासदायक ठरु शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचे असल्यास ते जमिनीवर अथवा रेसकोर्सच्या जागेवर उभारावे. सर्वच थोर पुरुषांची स्मारके रेसकोर्सवर उभारणे शक्य असल्याचे येथील मच्छिमारांचे म्हणणे आहे. या प्रभागात असणाऱ्या बंदरांवर सुमारे ८० ते ९० हजार लोकांची उपजिविका सुरु आहे. याठिकाणी स्मारक उभे राहिल्यास एवढ्या सर्व लोकांच्या उपजिविकेच्या साधनावर परिणाम होणार आहे. ससून डॉक बंद करुन थीम पार्क उभारण्याची घोषणाही भाजपने केली आहे. ससून डॉक हलवल्यास ते कुठे नेणार? याविषयी स्पष्टता नाही, असे स्थानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मच्छिमार झाले नाराजछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचे असल्यास ते जमिनीवर अथवा रेसकोर्सच्या जागेवर उभारावे. सर्वच थोर पुरुषांची स्मारके रेसकोर्सवर उभारणे शक्य असल्याचे येथील मच्छिमारांचे म्हणणे आहे.या बंदरांवर ९० हजार लोकांची उपजिविका सुरु आहे.