शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या नगरसेवकाचा निर्घृण खून

By admin | Updated: August 28, 2016 19:28 IST

माजी उपनगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव (वय ४७) यांचा आज दुपारी भरदिवसा बाजारपेठेत तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण खून करण्यात आला.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 28 -शिरूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव (वय ४७) यांचा आज दुपारी भरदिवसा बाजारपेठेत तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर मल्लाव यांच्या समाजाचे लोक, तसेच नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यात घुसून पोलीस ठाण्याची तोडफोड केली. या संतप्त जमावाला पाहून पोलिसांना पलायन करावे लागले. काही पोलिसांना मारही बसला.या घटनेनंतर काही तास उलटूनही पोलिसांची जादा कुमक येथे पोहोचली नाही. प्रक्षुब्ध जमाव शांत होण्यास तयार नव्हता. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना आमच्या हवाली करा, अशी एकच मागणी जमाव करीत होता. माझ्या भावाच्या जिवाला धोका असल्याची लेखी तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी मात्र याची दखल न घेतल्याने माझ्या भावाचा खून झाला, असे मल्लाव यांचा भाऊ दिनेश मल्लाव ओरडून सांगत होता. जमाव रस्त्यावर ठिय्या मांडून होता. या वेळी यवत पोलीस ठाण्याची गाडी तेथे आली असता, जमावाने गाडीवर दगडफेक करून गाडी पलटी केली. यामुळे एस.आर.पी.च्या तुकड्या येथे मागवण्यात आल्या. संंपूर्ण जिल्ह्यातून पोलीस शिरूरकडे निघाल्याचे साडेपाच वाजण्याच्या सुमारास समजले.दरम्यान, भरदिवसा घडलेल्या निर्घृण खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण गाव भीतीने बंद करण्यात आले. जोपर्यंत गावडेंना हवाली करत नाही, आरोपींना अटक करीत नाही, तोपर्यंत बॉडी (मृतदेह) ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली आहे. येथील रामआळी भागात ही घटना घडली. मल्लाव हे एक अंत्ययात्रा आटोपून अ‍ॅक्टीव्हावर घरी निघाले असता, दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर मोठे प्रहार करण्यात आल्याने त्यांचा मेंदू बाहेर पडला. हात तुटला. रक्ताच्या थारोळ्यात मल्लाव जागीच मृत पावले.