शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळे, कदम, पायगुडे की वारे ?

By admin | Updated: May 16, 2014 04:18 IST

लोकसभेसाठी महायुतीतर्फे अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजित कदम, मनसेचे दीपक पायगुडे व आपचे सुभाष वारे यांच्यात थेट लढत झाली आहे.

पुणे : लोकसभेसाठी महायुतीतर्फे अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजित कदम, मनसेचे दीपक पायगुडे व आपचे सुभाष वारे यांच्यात थेट लढत झाली आहे. विद्यमान खासदार सुरेश कलमाडी रिंगणाबाहेर असल्याने पुण्याच्या नव्या कारभार्‍याची माळ कोणाच्या गळ््यात पडणार? याची उत्सुकता उद्या संपणार आहे. पुणे लोकसभेसाठी २९ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत चौरंगी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहाराचे आरोप असल्याने विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने तिकीट नाकारले. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या गोटातून युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना नवा चेहरा म्हणून उमेदवारी मिळाली. विश्वजित यांच्यासाठी राहुल गांधी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सभा घेतल्या. शिवाय पहिल्यांदाच राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढविल्याचे चित्र शेवटपर्यंत होते. महायुतीतर्फे उमेदवारीसाठी आमदार गिरीश बापट व शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्यात चुरस होती. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ हजार मताने पराभूत झालेले गोपीनाथ मुंडेसमर्थक अनिल शिरोळे यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा तब्बल १४ टक्के अधिक मतदान झाले. तसेच, काँग्रेस आघाडीचे आमदार असलेले मतदारसंघ वडगावशेरी, शिवाजीनगर व कॅन्टोन्मेंटमध्ये मतदानाची टक्केवारी ५० ते ५३ टक्के इतकी आहे. त्याचवेळी महायुतीचा प्रभाव असलेले कसबा, कोथरूड व पर्वती मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ५४ ते ६२ टक्के आहे. शिरोळे यांना मोदी लाटेचा फायदा होणार की, विश्वजित कदम यांना प्रचारातील आघाडी तारणार, याची उत्सुकता आहे.