शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

शिर्डीत शंकराचार्यांच्या प्रतिनिधीला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 18:54 IST

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीचे प्रतिनिधी दंडी स्वामी सरस्वती यांच्यावर आज शिर्डीत काळी शाई फेकुन संताप व्यक्त करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

शिर्डी, दि. 12 - साईबाबांच्या देवत्वाला आव्हान देणाऱ्या शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीचे प्रतिनिधी दंडी स्वामी सरस्वती यांच्यावर आज शिर्डीत काळी शाई फेकुन संताप व्यक्त करण्यात आला. आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात शिर्डीत दाखल झालेले दंडी स्वामी पाच वाजेपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयात बसून होते. तेथून पोलीस त्यांना बाहेर काढत असताना साईबाबांचा जयजयकार करत एका अज्ञात तरुणाने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकून संताप व्यक्त केला. साईबाबा देव नसुन त्यांची कोणी पुजा करू नये, या शंकराचार्य व दंडीस्वामीच्या भुमिकेमुळे साईभक्ताक्तांमध्ये नाराजीची भावना होती.गेल्या २९ जून रोजी दक्षिणेतील रमणानंद स्वामींनी साईबाबांच्या देवत्वाच्या समर्थनार्थ शिर्डीत मेळाव्याचे आयोजन केले होते.याच बरोबर त्यांनी शंकराचार्यास या विषयावर वादविवादा साठी आव्हान दिले होते. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून रमणानंद स्वामींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्या बरोबर प्रशासनाने दंडी स्वामींना नोटीसा बजावुन शिर्डी महसूल क्षेत्रात येण्यापासून रोखले होते.प्रशासनाच्या व संबधित अधिकाऱ्याच्या या निर्णया विरोधात दंडी स्वामींनी उच्च न्यायायलयाचे दरवाजे ठोठावले होते़ यावर न्यायालयाने दंडी स्वामींना शिर्डीत जाण्यास सशर्त परवानगी दिली होती़ साईबाबा मंदीरात जाणार नाही,माध्यमांशी बोलणार नाही व अशांतता निर्माण होईल असे कोणतेही कृत्य व वक्तव्य करणार नाही आदी अटींवर दंडी स्वामींना अठ्ठेचाळीस तासांसाठी शिर्डीत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती़त्यानुसार दंडी स्वामी आज दुपारी पोलीस संरक्षणात दुपारी सव्वा दोनच्या सुमारास प्रांत कार्यालयात आले होते़ यावेळी प्रांताधिकारी बाहेर गावी होते़ त्यामुळे स्वामींनी तहसिलदार सुभाष दळवी,पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील आदी अधिकाऱ्याना आपणास शिर्डीत येण्यापासुन रोखल्याबद्दल जाब विचारला. यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यासह परिसरात साध्या वेषातील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ दरम्यान पाचच्या सुमारास स्वामींनी पोलीस ठाण्यात जावुन बसण्याचा निर्णय घेतला़ यावेळी त्यांना बंदोबस्तात बाहेर काढत असतांनाच अचानक आलेल्या एका तरूणाने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली व साईबाबांचा जयजयकार करत तो दिसेनासा झाला़ पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ यानंतर दंडी स्वामी पोलीस संरक्षणात औरंगाबादकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले़ ते जात असतांना काही नागरीकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या