शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंडळाची पोर हुश्शार ....

By admin | Updated: July 25, 2016 15:34 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने मुलांची संख्या रोडावत असतानाच, पालिकेने संगीत विषयक शिक्षण देण्यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू केलेल्या श्री संत तुकाराम महाराज संगीत कला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २५  : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने मुलांची संख्या रोडावत असतानाच, पालिकेने संगीत विषयक शिक्षण देण्यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू केलेल्या श्री संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगित विषयातील गायन, हार्मोनियम तसेच तब्बला परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परिक्षेत प्रबोधीनीचा 100 टक्के निकाल लागला आहे. 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी या कला प्रबोधिनिच्या एकूण 181 विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. यात गायन विभागात 64 हार्मोनियम मध्ये 59 तर तबला विभागात 58 विद्यार्थी यशस्वी झाली आहेत.

महापालिकेने आॅक्टोबर 2013 मध्ये तत्कालीन शिक्षण प्रमुख बाबा धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली 2013 मध्ये ही कला प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रबोधिने मध्ये वारजे , कर्वेनगर, कोथरूड, बावधन, नळस्टॉप, जनवडी या भागातील इयत्ता 4 थी ते सातवी मधील मुलांना संगित विषयक विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यात प्रामुख्याने हार्मोनियम, तबला, गायन याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी संगीत विषयक ज्ञान असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूकही करण़्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आणलेल्या मुलांची वाहतूक व्यवस्थाही शिक्षण मंडळाकडूनच केली जाते.

या परिक्षेसाठी अनिता सुळे , अर्चना इरपतगिरे, उमेश जाधव, मंगेश राजहंस, या शिक्षकांनी विशेष जबाबदारी घेतली होती. त्यामुळे यातील 13 मुलांना विशेष प्राविण्य मिळालेले आहे. या मुलांचा विशेष सत्कार लवकरच शिक्षण मंडळाच्या वतीने केला जाणार आहे. या संगीत प्रबोधीनी मध्ये स्वतंत्र परिक्षा केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळालेली असल्याची माहिती माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी दिली.त्यामुळे लवकरच संगीत विषयक परिक्षाही घेण्यात येणार असल्याचे सांगितले.