शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

शिरोलीत बिबट्याची दहशत!

By admin | Updated: March 2, 2017 01:30 IST

बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत

ओझर : जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील तळवस्ती परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री अपरात्री बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरीवर्ग अक्षरश: रडकुंडीला आला आहे. शेतीमालाच्या ढासाळलेल्या बाजारभावमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेती पीक त्यांच्यासाठी जीव की प्राण बनले आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकरीवर्गाला आर्थिक आधार असलेल्या उन्हाळा हंगामातील शेतीपिके जगविताना दमछाक झाली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे शेतीपिकांना पाणी देताना शेतकरीवर्गाला विजेच्या भारनियमनाचे गणित सांभाळून कसरत करावी लागत आहे. दिवसा कृषीपंपांना वीजपुरवठा उपलब्ध नसल्यावर रात्री वीज उपलब्ध असताना शेतीपिकांना पाणी द्यावे लागत आहे.शेतकरीवर्ग जीव धोक्यात घालून शेती पिकांना पाणी भरत आहे. बिबट्या मोठ्या उसामध्ये लपन करत आहे. परंतु, ऊसतोड सुरू असल्यामुळे ज्या उसामधे बिबट्याचे वास्तव्य आहे; तो ऊस तुटला की बिबट्या दुसरीकडे पलायन करत आहेत. त्यामुळे बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. शेती पिकांच्या आजुबाजूला बिबट्याच्या पायाचे मोठे मोठे ठसे पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. या भागात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरीवगार्तून होत आहे. (वार्ताहर)