शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शेटजींना घरी बसवले

By admin | Updated: October 24, 2014 04:04 IST

जिल्ह्याचे राजकारण करावयाचे झाल्यास साखर कारखाना असल्यास सहज शक्य असल्याचे सूत्र आता बदलले

प्रकाश पाटील, कोपार्डे (जि़ कोल्हापूर)जिल्ह्याचे राजकारण करावयाचे झाल्यास साखर कारखाना असल्यास सहज शक्य असल्याचे सूत्र आता बदलले असून, सहकारातून राजकारणापेक्षा समाजकारणातून राजकारण हा नवीन ट्रेंड येत असल्याचे चित्र विधानसभा निवडणुकीत दिसले. कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांत ७ कारखानदार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी आमदार चंद्रदीप नरके वगळता सर्व कारखानदारांना मतदारांनी नाकारले. जिल्ह्यात १९६०नंतर सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे, दादासाहेब पाटील (कौलवकर), डी.सी. नरके, रत्नाप्पाण्णा कुंभार या दिग्गजांनी सहकारातून समृद्धीचा मंत्र ग्रामीण जनतेला दिला. या सहकार महर्षीमधील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार वगळता सर्वच सहकार महर्षींनी राजकारणापेक्षा आपल्या संस्थांतून समाजकारण करणेच पसंद केले. या सहकार महर्षींची दुसरी पिढीही काही प्रमाणात राजकारणापासून अलिप्त राहिली व आपले साखर कारखाने व ऊस उत्पादक यांचे हित सांभाळण्यात धन्यता मानू लागली.मात्र, १९९०नंतर हा ट्रेंड बदलला व याच सहकार महर्षींची तिसरी पिढी सहकारी साखर कारखान्यात राजकीय वारसा चालवू लागली. यात सर्व जण तरुण व महत्त्वाकांक्षी होते. आपल्या हातात असणाऱ्या साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा जनसंपर्क व मोठा राजकीय गट यांचा वापर करून राजकारण करता येऊ शकते, हे ओळखत ‘वारणा समूहा’चे विनय कोरे, ‘कुंभी’चे अध्यक्ष आम. चंद्रदीप नरके, डी.वाय. पाटील कारखान्याचे अध्यक्ष सतेज पाटील, ‘जवाहर’चे प्रकाश आवाडे, ‘बिद्री’चे के.पी. पाटील, ‘शरद’ नरंदेचे राजेंद्र पाटील (यड्रावकर), ‘दत्त’ शिरोळचे सा.रे. पाटील, ‘राजाराम’ बावड्याचे महाडिक यांनी गेल्या १० वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात अधिराज्य गाजविले आहे. ऊसदराबाबत ज्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या जिवावर या कारखानदारांचे राजकारण सुरू आहे त्या कारखानदारांनी शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले. हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना ऊसदराबाबत संघर्ष करीत डोकी-फोडून घ्यावी लागत होती.हंगाम २०१३-१४चा विचार केल्यास २२५० व केंद्राने दिल्यानंतर ४०० असा २६५०चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, पॅकेज मिळूनही कारखानदारांनी घूमजाव केले व एफआरपीच देणार असल्याचा पवित्रा घेतला. यामुळे हंगाम २०१३-१४मध्ये शेतकऱ्यांना किमान ३०० कोटींचा फटका बसला. यामुळे साखर कारखानदारांबाबत कमालीचा असंतोष निर्माण झाला. याचाच परिणाम १० विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या ७ कारखानदारांपैकी ६ उमेदवारांना पराभूत करीत तुम्ही पहिले तुमचे कारखाने सांभाळा, असा जणू संदेश दिला आहे.