शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ला मिळाला आरतीचा मान

By admin | Updated: September 7, 2014 00:25 IST

सामाजिक एकात्मतेचा संदेश देणा:या गणोशोत्सवात पुरुषांबरोबरच सार्वजनिक उत्सवात पहिल्यांदाच महिलांना बरोबरीचा मान मिळाला आहे.

पुणो : सामाजिक एकात्मतेचा संदेश देणा:या गणोशोत्सवात पुरुषांबरोबरच सार्वजनिक उत्सवात पहिल्यांदाच  महिलांना बरोबरीचा मान मिळाला आहे. ‘लोकमत’च्या ‘ती’च्या गणपतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपनगरांसह शहरातील विविध मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला. 
4आनंदनगर येथील एकता सार्वजनिक मित्र मंडळाने आरतीचा मान महिलांना देवून नवीन आदर्श घातला आहे, अशी माहिती एकता मंडळाचे संस्थापक हेमंत जगताप यांनी दिली. सार्वजनिक उत्सवात महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने लोकमतने ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार, शहरातील गणोश मंडळांनीही या उपक्रमास महिलांना गणोश आरतीची संधी द्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनास सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी येथील एकता मित्र मंडळाने दिला आहे. तसेच, परिसरातील सोसायटय़ांमधील गणोश मंडळांनीही महिलांना आरती करण्याचा मान देण्याचे आवाहन केले आहे.  पुष्पा दिवेकर, स्वाती वाघ यांच्याहस्ते ही आरती करण्यात आली.
4या परिसरातील सोसायटय़ांमधील नागरिकांना एकत्रित बांधण्याचे काम या मंडळाने विविध उपक्रमांतून जोपासले आहे. मंडळाकडून संपूर्ण वर्षभर महिला, मुले, तसेच युवकांसाठी विविध उपक्रमही राबविले जातात. या वेळी अध्यक्ष रामदास पिंगळे, खजिनदार मुकुंद नारखेडकर , परमेश्वर राजगिरे, किरण राऊत, अविनाश रेणूसे, विजय चव्हाण, संतोष गाडे, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.   
 
‘ती’चा गणपती अथर्वशीर्ष पठण
4पुणो : ‘गणादिं पूर्वमुच्चायर्ं वर्णादिं तदनंतरम्, अनुस्वार: परतर:, अर्धेंदुलसितम्, तारेण ऋध्दम् एतत्तव मनुस्वरुपम् गकार: पूर्वरुपम्, अकारो मध्यमरुपम्, अनुस्वारश्चान्त्यरुपम्, बिन्दुरुत्तररुपम् नाद:संधानम् संहितासंधी:, सैषा गणोश विद्या, गणकऋषि: निचृद् गायत्री छंद:, गणपतीर्देवता, ú गं गणपतये नम:’ या मंत्रोच्चाराने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. निमित्त होते शनिवारी ‘ती’चा गणपतीसमोर आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठणाचे. 
4 गणोशोत्सवामध्ये बाप्पांची आराधना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. अथर्वशीर्ष पठण हा गणरायाचा गजर करण्याचा एक उत्तम मार्ग. स्मरणशक्तीत वाढ होऊन शरीराभोवती एक संरक्षक कवच निर्माण करण्यास महत्त्वाचे असणा:या या अथर्वशीर्ष पठणाचा सुरेल  नाद ‘ती’चा गणपतीतही उमटला.
4अनामिका ग्रुपच्या उल्का देशपांडे व त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी शनिवारी सायंकाळी सखी गणोश मंडळाच्या ‘ती’चा गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण केले. या वेळी सामूहिकरित्या महिलांनी अथर्वशीर्षाची लागोपाठ 11 आवर्तने म्हटली. देशपांडे यांच्यासह सुमंगला साठे, सुलभा परांजपे, सुनीता एडगावकर, सुनंदा वर्तक, लता गोखले या महिलांनी उत्स्फूर्तपणो सहभाग घेतला होता.