शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

...तिने त्याच्याच ग्रुपवर टाकली एफआयआर कॉपी

By admin | Updated: July 16, 2017 03:18 IST

बोरीवली लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात मुलीचे आक्षेपार्ह फोटो क्लिक करत ते मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या तरुणाला एका महिला प्रवाशाने

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोरीवली लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात मुलीचे आक्षेपार्ह फोटो क्लिक करत ते मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या तरुणाला एका महिला प्रवाशाने चांगलाच धडा शिकविला. तिने त्याचा हा प्रताप उघडकीस आणत त्याच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी पोस्ट केली आणि अश्लील कमेंट्स मारणाऱ्या मित्रांचीही बोलती बंद केली. नीलेश वेद (२६) असे अटक आरोपीचे नाव असून तो बँकेत काम करतो.तक्रारदार तरुणी ११ जुलैला रात्री ९.३० वाजता चर्चगेटहून बोरीवलीकडे जाणाऱ्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून पुरुष सहकाऱ्यांबरोबर प्रवास करत होती. सुरुवातीला तिच्यासमोर बसलेला वेद दुसरीकडे जाऊन लोकलच्या त्याच डब्यातील मुलीचे फोटो मोबाइलमध्ये काढत असल्याचा संशय तिला आला. तिने त्याला वेळीच रोखून त्याच्या मोबाइल हिसकावला. तेव्हा त्यात तिचेही फोटो असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तसेच त्याने हे फोटो मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकले. त्यावर अश्लील कमेंट्सही आल्या होत्या. तरुणीने त्याला धडा शिकविण्यासाठी रेल्वे हेल्पलाइनवर संपर्क साधला. पण त्यावर संपर्क न झाल्याने १०० क्रमांकावर तक्रार नोंदविली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)च्या जवानांनी मालाड येथे वेदला ताब्यात घेतले. त्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. वेदविरुद्ध गुन्हा दाखल होताच या तरुणीने एफआयआरची कॉपी त्याच्याच मोबाइलवरून त्याच्या मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली.