शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार प्रचारासाठी ठाण्यात

By admin | Updated: May 29, 2016 00:35 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता आणखी जोर धरू लागला असून यामध्ये आघाडी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता आणखी जोर धरू लागला असून यामध्ये आघाडी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेदेखील निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या या एका जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रथमच आरपार अर्थात कांटे की टक्कर होणार आहे. ही जागा जिंकून सलग पाचव्यांदा आमदार होण्याचा मान डावखरे यांना भूषवायचा आहे. मात्र, यंदा त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवल्याने एक रंगतदार लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याची स्थिती पाहता शिवसेनेकडे जरी मतांची आघाडी असली तरीदेखील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा जिल्ह्यातील वावर पाहता आणि इतर पक्षांमधील नेत्यांबरोबर असलेला घरोब्याच्या संबंधामुळे ते या निवडणुकीत आपले डाव खरे करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेनेदेखील ही निवडणूक जिंकण्याचे ठरवल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. एकूणच आता या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मुख्यमंत्री स्वत: या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. रविवारी नगरसेवकांसाठी मार्गदर्शन मेळावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेस शरद पवार नगरसेवकांना काय कानमंत्र देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीची ताकद कळणार- येत्या काही महिन्यांवर आता ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला आपली ताकद दाखवण्याची संधी असून ती गमावल्यास आगामी निवडणुकीतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही करून ही निवडणूक जिंकायचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.