शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला पाठिंबा देणार नाही, लिहून देतो - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 17:40 IST

शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात आले तर, आम्ही पाठिंबा देणार नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 18 - शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात आले तर, आम्ही पाठिंबा देणार नाही. हे मी लिखित मध्ये लिहून द्यायला तयार आहे. पण तसेच शिवसेनेनेही पाठिंबा काढणार हे लिहून द्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शनिवारी  पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. 
 
शिवसेनेने मुंबई आणि अऩ्य महापालिका निवडणुकीसाठी भाजपा बरोबरची युती तोडली आहे. दोन्ही पक्ष दररोज परस्परांवर टोकाची टीका करत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपा बरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे विधान केले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची चर्चा आहे. 
 
उद्या असे घडलेच तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला साथ देईल अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा खुलासा केला. भाजपा राजकारणातल्या पारदर्शकतेबद्दल बोलते. पण सध्या प्रचारामध्ये ते भरपूर पैसा खर्च करतायत. मुंबईमध्ये हे सर्वत्र दिसतेय अशी टीका पवारांनी केली तसेच नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वत्र क्षेत्रांना फटका बसला. छोटया व्यवसायातील रोजगार कमी झाले. अनेक गावांना फटका बसला असे त्यांनी सांगितले.