शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शाहीर प्रमोद लोखंडे कला पथकाच्या जीपला अपघात, चौघांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2016 15:30 IST

जिल्ह्यातील अहमदपूर आणि रेणापूर येथील भीमगितांचा कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेली तवेरा कार महापूरच्या पुलावरून नदी कोसळली़ या अपघातात चौघेजण जागीच ठार झाले

ऑनलाइन लोकमत - 
लातूर, दि. 05 : जिल्ह्यातील अहमदपूर आणि रेणापूर येथील भीमगितांचा कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेली तवेरा कार महापूरच्या पुलावरून नदी कोसळली़ या अपघातात चौघेजण जागीच ठार झाले तर चौघांवर उपचार सुरू आहेत़ ही घटना मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली़ त्यांचा मंगळवारी नवी मुंबईच्या ऐरोली भागात भिमगीतांचा कार्यक्रम होणार होता़ 

या घटनेत विजय मस्के, राहूल मस्के (बोरगाव, गंगाखेड), आनंद शिरसाट (गुंजोटी, अहमदपूर) आणि रामकृष्ण मुलुखपाडे (कोरगाव, लोहा) या चौघांचा जागीच मृत्यू झाला़ सिनेगायक प्रमोद लोखंडे (नागठाणा, अहमदपूर), बाजीराव गोडबोले (जांब, जळकोट), राजेंद्र सोनकांबळे (कोष्टगाव, अहमदपूर) आणि राजकुमार ढगे (किनगाव, अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत़ गायन पार्टीचे प्रमुख प्रमोद लोखंडे यांना सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ़ किनीकर यांनी सांगितले़ अपघात होताच एका जखमीने लातूरच्या नातलगांना घटनेची माहिती दिली़ नातलगांनी पोलिसांना कळविले़ रेणापूर पोलिसांच्या गस्ती पथकाने जखमींना १०८ रूग्णवाहिकेच्या मदतीने लातूरच्या शासकीय रूग्णालयात पाठविले़ आठपैकी चारजणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले़ याप्रकरणी रेणापूर पोलिसांत गुन्हा नोंद केल्याची माहिती निरीक्षक बंडोपंत कुलकर्णी यांनी दिली़ हा अपघात स्टेअरिंग रॉड तुटल्याने घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे़