शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ

By admin | Updated: May 24, 2017 01:35 IST

खालापूर तालुक्यातील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याचा लैंगिक छळ झाल्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : खालापूर तालुक्यातील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुरुकुलमधील दोन कर्मचाऱ्यांविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन १३ वर्षीय मुलगा मुंबई चेंबूर येथील राहणारा असून, तो खालापूर तालुक्यातील आसरे येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत शिक्षणासाठी वसतिगृहात राहत होता. २९ मार्च २०१७ रोजी रात्री हा अल्पवयीन मुलगा मस्ती करतो म्हणून त्या ठिकाणी असलेले कर्मचारी दर्शित भुत व यश विराणी या दोघांनी त्याला मारहाण करून गुप्तांगाला चिमटे घेतले. त्यानंतर शाळेला सुटी लागल्यानंतर घरी गेल्यावर पीडित मुलाने सर्व प्रकार पालकांना सांगितला. मुलाच्या बाबतीत घडलेला प्रकार ऐकून हादरलेल्या पालकांनी तातडीने गुरुकुल शाळा गाठत व्यवस्थापनाकडे तक्रार केली; परंतु एक ते दीड महिना होऊनही व्यवस्थापनाने ही घटना गांभीर्याने न घेता, दोन्ही कर्मचारी गुजरात येथे गेले आहेत सांगत पीडित मुलाच्या पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर संतप्त पालकांनी खालापूर पोलीस ठाणे गाठत मुलाला मारहाण करून त्याचा लैंगिक छळ करणाऱ्या दर्शित भुत व यश विराणीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार खालापूर पोलिसांनी गुरुकुल इंटरनॅशनल शाळेच्या कर्मचाऱ्यांविरोधात बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास एपीआय पवार करीत आहेत.