शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन शाळकरी मुलींशी अश्लील वर्तन

By admin | Updated: July 24, 2014 23:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व बारामती पंचायत समितीचा माजी सदस्य शिवाजी चव्हाण याने अल्पवयीन शालेय मुलींशी केलेले चाळे आज उघड झाले.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व बारामती पंचायत समितीचा माजी सदस्य शिवाजी चव्हाण याने अल्पवयीन शालेय मुलींशी केलेले चाळे आज उघड झाले. आज सकाळी 9 अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन, विनयभंग, अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याअंतर्गत  वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरूम (ता. बारामती) येथील 8 ते 9 अल्पवयीन मुली रोज 8 वाजता वाणोवाडी येथे बाजारतळावर बी. जी. क्लासेसला येतात. त्यातील एका मुलीची सायकल पंक्चर झाल्याने सर्व मुली पंक्चर काढण्यासाठी वाणोवाडी सिनेमा चौकात येत होत्या. या सर्व मुली काटकर दवाखान्याजवळ आल्या असता आरोपी शिवाजी पांडुरंग चव्हाण (वय 6क्, रा. वाणोवाडी, मळशी, ता. बारामती) त्याच्या चारचाकी गाडी (क्रमांक  एम. एच. 42/5353) या क्रमांकाच्या गाडीतून तेथे आला. सायकल पंक्चर काढायला निघालेल्या 8 ते 9 अल्पवयीन मुलींच्या शेजारी गाडी उभी करून ‘मुलींनो, तुम्ही कुठल्या?’ अशी विचारणा केली. या वेळी सर्व मुलींनी आपल्या चेह:यावर स्कार्प बांधले होते. मी कोण आहे, माहीत आहे का तुम्हाला? मी अमुक तमुक असल्याचे सांगत मुलींना स्वत:च्या खिशातील आयकार्ड काढून दाखविले. आरोपीने चार मुलींच्या चेह:यावरील स्कार्प ओढून काढले. त्यानंतर एका मुलीचा जबरदस्तीने गाल धरून ओढला. एकीच्या पाठीवरून हात फिरविला, तर एकीच्या खांद्यावर हात ठेवला. यावर एका मुलीने ‘काका, तुम्ही असे का करता?’ अशी विचारणा केली. 
त्यावर तू गप्प बस, नाही तर तुङया कानाखाली देईल. सायकल पंक्चर झालेल्या मुलीला चव्हाण म्हणाला, ‘तुझी सायकल इथेच ठेव. चल माङया गाडीत बस.’ त्या मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला. तरी देखील ‘चल चिकणो, आता मी जातो,’ असे म्हणत मुलींना लज्ज उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. तसेच, मुलींना घाणोरडय़ा भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी शिवाजी चव्हाण निघून गेला. घाबरलेल्या मुलींनी घरी जाऊन हा प्रकार पालकांना सांगितला.  संतप्त झालेल्या पालकांनी थेट वडगाव निंबाळकर पोलीस ठाणो गाठले.  त्यानंतर गावातीलच काही राजकीय मंडळींनी पालकांची समजूत काढून प्रकरण दडपण्याचा दिवसभर प्रयत्न केला. मात्र, पालकांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . 
वडगाव निंबाळकर पोलिसांनी भादवि कलम 354 अ (1) अंतर्गत व बाललैंगिक आत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर आरोपी चव्हाण पसार झाला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.