शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

धाटावमध्ये सांडपाणी वाहिनी फुटली

By admin | Updated: September 5, 2016 03:08 IST

रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये मागील कित्येक महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत असलेली रासायनिक सांडपाणी वाहिनी रविवारी अचानक फुटली.

धाटाव : रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये मागील कित्येक महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत असलेली रासायनिक सांडपाणी वाहिनी रविवारी अचानक फुटली. सबंध रोहेकरांची जीवनवाहिनी असलेली कुंडलिका नदी आज अक्षरश: हिरवीगार झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र सततच्या जलप्रदूषणामुळे नदीकिनारी असलेल्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.धाटाव औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी वाहिनीच्या दुरु स्ती कामावर आजवर कोट्यवधी रु पये खर्च झाले आहेत. मात्र निकृष्ट दर्जाचे काम करून संबंधित ठेकेदारानेही प्रशासनाला चुना लावल्याची ही चर्चा आहे. आज कित्येक महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत असलेली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रासायनिक सांडपाणी वाहिनी ही रासायनिक प्रक्रि या केंद्रातील टँक भरल्यामुळे दरम्यान सांडपाणी वाहिनीवर ताण आल्यामुळे ही वाहिनी एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावरील एक्सेल नाका ते रेप्टाकोस कंपनी रस्त्यालगत डाव्या बाजूला फुटल्याने जलवाहिनीतील हिरव्या रंगाचे रसायन लगतच्या नाल्याद्वारे सर्वत्र पसरले. सबंध परिसरात पाणीच पाणी झाले असून हे पाणी अंबा नदीवाटे रोठखुर्द गावानजीक कुंडलिका नदीच्या पात्रात घुसल्याने संपूर्ण कुंडलिका हिरवीगार झाली.रोहा तालुक्यात धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या जल प्रदूषणाबरोबर वायू प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. या वायू प्रदूषणापासून नागरिक त्रस्त झाले आहेत.विविध प्रकारच्या रासायनिक कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या दुर्मीळ वायूचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात धुक्याचा आधार घेत बिनधास्त वायू वातावरणात सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची अनेकदा मागणी करूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मात्र यावर नियंत्रण नसल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. या परिसरात अनेक कंपन्यांनी वायुप्रदूषणाचे अक्षरश: थैमान घातले आहे. औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याने जल व वायू प्रदूषणाविषयी कारखान्यांविरोधात स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.>परिसरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारारोहा तालुक्यात धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या जल प्रदूषणाबरोबर वायू प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. या परिसरात अनेक कंपन्यांनी वायुप्रदूषणाचे अक्षरश: थैमान घातले आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मात्र यावर नियंत्रण नसल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याचा स्थानिकांचा आरोप असून जल व वायुप्रदूषणाविषयी कारखान्यांविरोधात स्थानिक मंडळींनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. >धाटाव औद्योगिक वसाहतीत जीर्ण अवस्थेत असलेली सांडपाणी वाहिनी रस्त्यालगत अचानक फुटली. ही घटना उशिरा निदर्शनास आल्याने संबंधित कारखान्यांना सांडपाणी सोडू नये असे सांगण्यात आले. या सांडपाणी वाहिनीची गळती थांबविण्याचे काम सुरु केल्याने हे काम लवकरात लवकर होईल.- पी. ए.पांचाळ, उप अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रोहा