शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायमॅक्स’च्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

By admin | Updated: November 12, 2015 02:59 IST

एसटी वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक तिकिट मशिनच्या कराराची मुदत संपुष्टात येतानाच नियम धाब्यावर बसवून ट्रायमॅक्स कंपनीला चढ्या भावाने

मुंबई : एसटी वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक तिकिट मशिनच्या कराराची मुदत संपुष्टात येतानाच नियम धाब्यावर बसवून ट्रायमॅक्स कंपनीला चढ्या भावाने निविदा देण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला. या संशयास्पद व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसटी महामंडळाकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. या समितीवर अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गौतम चॅटर्जी, परिवहन आयुक्त सोनिया सेठी आणि उप सचिव (परिवहन) साबळे यांची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एका महिन्यात चौकशी अहवाल देण्यात येणार असून यात तथ्य आढळल्यास निविदा करार रद्द करुन दोषी एसटी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एसटी वाहकांना पाच वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक तिकिट मशिन देण्यात आले होते. या करारानुसार कराराची मुदत संपुष्टात येतानाच ही सेवा आपल्या ताब्यात एसटी महामंडळाने घेणे गरजेचे होते. तसेच पुढील दोन वर्षे सगळ्या मशिनची देखभाल व दुरुस्तीही करारानुसार ट्रायमॅक्स कंपनीकडून केली जाणार होती. परंतु तसे न करता या कंपनीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासोबतच प्रत्येक तिकिटामागे २१ पैशांऐवजी ४१ पैसे वाढ देण्याचा निर्णयही घेतला. या अजब निर्णयामुळे एसटीत ‘आर्थिक’ गणिते असल्याची जोरदार चर्चा झाली. त्यामुळे या संशयास्पद निविदा प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.