शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सत्र न्यायालयात दारू पार्ट्या

By admin | Updated: July 19, 2016 05:39 IST

नेहमी हायअ‍ॅलर्टवर असणाऱ्या सत्र न्यायालयात सध्या दारू पार्ट्या रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे

मनीषा म्हात्रे,

मुंबई- नेहमी हायअ‍ॅलर्टवर असणाऱ्या सत्र न्यायालयात सध्या दारू पार्ट्या रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शौचालयात दारूच्या बाटल्या असल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. त्याची खातरजमा केली असता, आजही या बाटल्यांचा खच शौचालयाच्या आवारात पाहावयास मिळाला. त्यामुळे सत्र न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबईतील कुलाबा येथील सत्र न्यायालयात टाडा, सीबीआय, एनआयए, एनडीपीएस, मोक्कासारखी वेगवेगळी न्यायालय आहेत. दहशतवाद्यांपासून कुख्यात गुंडांचे खटले याच ठिकाणी चालतात. नेहमीच अ‍ॅलर्टवर असलेल्या न्यायालयात काटेकोर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षेतून तंबाखूची पुडीही आतमध्ये नेण्यास बंदी असते. अशा परिस्थितीत येथील पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या पुरुष शौचालयात दारूच्या सापडलेल्या बॉटलमुळे सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. दारूच्या बाटल्यांचा खच असलेला हा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला. त्यानुसार, ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने तेथे जाऊन खातरजमा केली. सत्र व दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. विशेष म्हणजे याच मजल्यावर एनडीपीएसचे न्यायालय आहे. त्यात हा सर्व परिसर सीसीटीव्हीने वेढला आहे. अशात न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या शौचालयाचा वापर पोलीस तसेच तेथील कर्मचारी बाटल्यांकडे पाहून काणाडोळा करत असल्याचे पाहावयास मिळाले. सत्र न्यायालयात प्रवेश करण्यासाठी सामान्यांसाठी दोनच प्रवेशद्वार आहेत. तसेच अन्य प्रवेशद्वारातून वकिलांसाठी सोय करण्यात आली आहे. असे असताना नागरिकांच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनर मशीन तसेच मेटल डिटेक्टर बंद असल्याने तेथील पोलीस स्वत:च सामानाची तपासणी करतात, तरीही दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. त्यामुळे पोलीस, आरोपी आणि न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. >आरोपीही होतात पसार२१ सप्टें. २०१३ अहमदाबाद आणि सुरत बॉंबस्फोट प्रकरणांचा सूत्रधार असलेला इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) दहशतवादी अफजल उस्मानी याने पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) गुंगारा देत या न्यायालयातून पलायन केले होते. २३ सप्टें २०१५ न्यायालयाने कोठडी सुनाविल्यानंतर जामीन अर्जाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या तौफिक अहमद झैदीने (३०) पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता.१६ सप्टे. १९८३ सत्र न्यायालयात पठाण गंगच्या आमिर जादाला हजर करण्यात आले होते. त्यावेळी दाऊदने न्यायाधिशांच्या समोरच साक्षीदाराच्या बॉक्समध्येच त्याला गोळ्या घातल्या होत्या.>ड्रग्जचाही पुरवठाअवघ्या दोन हजारांत आरोपींना ड्रग्जही मिळत असल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे, पोलिसांकडूनच हे पुरविण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. ...तर शस्त्रेही आतज्या पद्धतीने सत्र न्यायालयात दारूच्या बाटल्या येत आहेत. त्याप्रमाणे, उद्या कोणीही येथे शस्त्रसाठा पुरवून हल्ला करू शकतो. हा सर्व परिसर सीसीटीव्हीने वेढला आहे. अशात न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या शौचालयाचा वापर पोलीस, तसेच तेथील कर्मचारी करतात. डोळ््यांदेखत असलेल्या बॉटलकडे पाहून ही मंडळी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.