शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चटणी-भाकरीच्या रूपाने नेहरूंची सेवा

By admin | Updated: November 14, 2015 03:46 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला

योगेश गुंड,  अहमदनगरभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला. त्यातील एक राजाराम साठे (पाटील). यजमानामार्फत नेहरूंना राजाराम पाटलांचा डबा किल्ल्यात जात होता. चटणी-भाकरीच्या रूपाने नगर तालुक्यातील नारायणडोहोसारख्या खेड्यातील स्वातंत्र्यसैनिकाला त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. नारायणडोहो येथील राजाराम मोराजी साठे विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात, तसेच स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. मोतीलाल फिरोदिया कुटुंबाकडे नेहरूंचे व इतर राष्ट्रीय नेत्यांचे यजमानपद होते. नेहरू १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात १० आॅगस्ट ते २८ मार्च १९४५ या काळात भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. या काळात नेहरू जसे नगरच्या घट्ट ‘बासुंदी’च्या प्रेमात पडले, तसेच राजाराम पाटलांच्या चटणी-भाकरीच्याही. यजमान यांच्यामार्फत नेहरूंना डबा देण्यासाठी राजाराम पाटील नारायण डोहो ते नगर हे १५ किलोमीटरचे अंतर पायी जात. त्यांच्या घरच्या चटणी-भाकरीच्या चवीने नेहरूंना मोठे समाधान मिळे. १९७२ला इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांनी नेहरूंच्या आठवणींचा उजाळा दिला. इंदिराजींनाही राजाराम पाटलांबद्दल आदर व आपुलकी वाटली.