शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

नगर रस्त्यावरील सेवा रस्ता गायब

By admin | Updated: June 10, 2016 00:49 IST

शहर विकास योजनेअंतर्गत तयार केलेला सर्व्हिस रोड गायब झाला असल्याची तक्रार वडगाव शेरी नागरिक कृती मंचने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली

पुणे : पुणे-नगर रस्त्यावर शास्त्रीनगर ते खराडी बायपासदरम्यान जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत तयार केलेला सर्व्हिस रोड गायब झाला असल्याची तक्रार वडगाव शेरी नागरिक कृती मंचने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. नगर रस्त्याच्या मूळ आराख़ड्यात रस्ता होता, त्याप्रमाणे तो तयारही करण्यात आला; मात्र आता तो नाही, असे मंचाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या रस्त्यावर वाहनांचे पार्किंग होत असल्याने तो गायब झाला आहे, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष आशिष माने यांनी दिली. त्यातून काही भाग शिल्लक राहतो तर त्यावर पथारीवाले, विक्रेते बसतात व रस्ता अडवतात. त्यातूनही रस्ता शिल्लक राहिलाच तर त्यावर पालिकेचे कर्मचारी, काही खासगी बांधकाम व्यावसायिक राडारोडा, कचरा आणून टाकतात. या सर्वांमुळे तो रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे बहुतांशी नागरिक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात व त्यामुळे अपघात होतात, असे माने म्हणाले. पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून या रस्त्याचे सर्वेक्षण करावे, सर्व्हिस रोड मोकळा करावा, अशी मागणी माने यांनी केली आहे. त्यामुळे रस्ता रुंद होऊन अधिकृत मार्गाने वाहतूक सुरू राहील, वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी) >बहुतांशी चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात व त्यातून अपघात होतात; त्यामुळे या रस्त्याचे सर्वेक्षण करावे, सर्व्हिस रोड मोकळा करावा.