शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्हे हे समाजाविरुद्ध मानायला हवेत - उच्च न्यायालय

By admin | Updated: August 28, 2016 02:12 IST

गंभीर स्वरुपाचे गुन्हा हा केवळ एका व्यक्तिविरोधातील गुन्हा आहे, असे न मानता तो गुन्हा संपूर्ण समाजाविरुद्ध आहे, असे मानायला हवे. त्यामुळे आरोपी आणि पिडीत जरी सामंजस्याने

मुंबई : गंभीर स्वरुपाचे गुन्हा हा केवळ एका व्यक्तिविरोधातील गुन्हा आहे, असे न मानता तो गुन्हा संपूर्ण समाजाविरुद्ध आहे, असे मानायला हवे. त्यामुळे आरोपी आणि पिडीत जरी सामंजस्याने एफआयआर रद्द करण्यासाठी आले तरी तो गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने हत्येचा गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर मत व्यक्त केले. हत्येचा गुन्हा व आयपीसीअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेल्या १२ जणांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती. तक्रारदाराबरोबर सामंजस्याने वाद मिटवण्यात आला आहे. त्यामुळे एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती आरोपींनी न्यायालयाला केली. मात्र उच्च न्यायालयाने नकार दिला. ‘आरोपींनी समाजाविरुद्ध गुन्हा केला आहे. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर आणि निघृण आहे. त्यामुळे त्यांचा हा गुन्हा केवळ एका व्यक्तीविरुद्ध असल्याचे न मानता संपूर्ण समाजाविरुद्ध आहे, असे मानायला हवे. पिडीत आणि आरोपींमध्ये तडजोड झाली असली तरी असे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा ठोठावणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.जुलैमध्ये कुर्ला पोलीस ठाण्यात झिया-उल-हक निजामुद्दीन अन्सारी आणि शहनवाज खान यांनी १२ जणांविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, ५ जुलै रोजी तक्रारदार आणि त्याच्या भावाला किरकोळ वादावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपास गेला की त्या १२ जणांनी बाजुलाच असलेल्या स्नॅक्स शॉपमधील उकळते तेल ओतले. त्यामुळे तक्रारदार गंभीररित्या भाजले. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ जणांना अटक केली. मात्र काही दिवसांनी तक्रारदारांनी पोलिसांना पत्र लिहून त्यांच्यातील वाद मिटल्याने एफआयआर रद्द करण्याची विनंती केली. परंतु, पोलिसांनी त्यांना गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. (प्रतिनिधी)