शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांचे निधन

By admin | Updated: December 12, 2014 00:06 IST

सोंगाड्या, मर्दानी, बन्या बापू अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक व ज्येष्ठ निर्माते

कोल्हापूर : सोंगाड्या, मर्दानी, बन्या बापू अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक व ज्येष्ठ निर्माते गोविंद कुलकर्णी (वय ८४) यांचे आज, गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, मुले डॉ. चारूहास भागवत, उमेश भागवत व मुलगी असा परिवार आहे. वृद्धापकाळामुळे गेले काही दिवस कुलकर्णी आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दुपारी तीन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंद कुलकर्णी हे मूळचे पैठणचे. त्यांचे खरे नाव शरद्चंद्र भागवत. चित्रपटांचे प्रचंड आकर्षण असल्याने त्यांनी घर सोडून कोल्हापुरात पाऊल ठेवले. गोविंद कुलकर्णी या नावाने त्यांनी चित्रपट कारकीर्द सुरू केली. ‘मुरळी मल्हारीरायाची’ या चित्रपटाचे १९६९ साली दिग्दर्शन करून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. अशी रंगली रात्र, चुडा तुझा सावित्रीचा, एकटा जीव सदाशिव, हऱ्या-नाऱ्या झिंदाबाद, लागेबांधे, गोविंदा आला रे आला, जय तुळजाभवानी, मानाचं कुंकू, बन्या बापू, हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘असंच पाहिजे नवं नवं’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. रक्षाविसर्जन उद्या, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता आहे. अंत्यसंस्कारास चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, संचालक सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांच्यासह कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.