शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सेनेला ‘मुका’मार!

By admin | Updated: September 28, 2016 05:31 IST

सकल मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच व्यंगचित्र

मुंबई : सकल मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच व्यंगचित्र छापल्याच्या निषेधार्थ बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आ. संजय रायमूलकर (मेहकर) आणि आ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याने शिवसेनेत भूकंप झाला आहे. मात्र शिवसेनेकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आहे. दरम्यान, नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी ‘मातोश्री’वर तातडीने बैठक आयोजित केल्याचे समजते. राज्यात ठिकठिकाणी ‘सामना’च्या अंकांची होळी करण्यात येत असतानाच मंगळवारी दुपारी सामनाच्या वाशी येथील कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक केली, तर ठाण्यातील कार्यालयावर शाई फेकली. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (विशेष प्रतिनिधी)उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करापुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मराठा क्रांती मूक मोर्चासंबंधी छापून आलेले आक्षेपार्ह व्यंगचित्र संतप्त करणारे असून, या प्रकरणी ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची तत्परता सरकारने दाखवावी. तसेच या प्रकरणी ठाकरेंनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेने माफी मागावी : मराठा आरक्षणासारख्या गंभीर विषयाची व्यंगचित्रातून टिंगलटवाळी करून या मोर्चात सहभागी लाखो माता-भगिनींचा अवमान करणाऱ्या शिवसेनेचा निषेध करीत, शिवसेनेने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्यभरात निघणारे सकल मराठा समाजाचे मोर्चे हा टिंगलीचा विषय नाही, असे चव्हाण यांनी शिवसेनेला खडसावले.राजीनामे दिलेच...बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर व सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पक्षप्रमुखांकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. खासदार जाधव यांच्या राजीनाम्यास त्यांचे पुत्र हृषीकेश यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. ते म्हणाले की, गटनेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत तातडीने बोलविलेल्या बैठकीला ते उपस्थित असून, रात्री उशिरा पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आमदार खेडेकर यांनीही आपण राजीनामा दिल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र ‘सामना’त छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं.- नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या, शिवसेना