शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुखसुविधा भोगणाऱ्यांना मराठवाड्यात पाठवा

By admin | Updated: October 1, 2016 01:26 IST

उच्च न्यायालयात बहुतांशी याचिका सरकारविरुद्ध असल्याने सनदी अधिकाऱ्यांच्या सूचनांशिवाय याबाबत निर्णय घेणे उच्च न्यायालयाला कठीण जाते. अधिकाऱ्यांना बजावूनही

मुंबई : उच्च न्यायालयात बहुतांशी याचिका सरकारविरुद्ध असल्याने सनदी अधिकाऱ्यांच्या सूचनांशिवाय याबाबत निर्णय घेणे उच्च न्यायालयाला कठीण जाते. अधिकाऱ्यांना बजावूनही योग्य वेळेत सरकारची भूमिका मांडली जात नाही. सरकारच्या या असहकार्यावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी कडाडून टीका केली. मुंबईत सुखसुविधा उपभोगणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना मराठवाड्यासारख्या तहानलेल्या ठिकाणी पाठवले पाहिजे तेव्हा त्यांना अद्दल घडेल, अशा तीव्र शब्दांत उच्च न्यायालयाने सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर टीका केली. ठाण्यातील एक लाख चौ. मी. भूखंडाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे सरकार विकासकाला रखडवत असल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. २०१४पासून उच्च न्यायालय राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत आहे; तरी ढिम्म सरकार उत्तर देण्यास तयार नसल्याने शुक्रवारी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने सरकारची खरडपट्टी काढली.‘हाय प्रोफाईल केसेसमध्ये तुम्हाला (सरकारी वकिलांना) सूचना देणारे अधिकारी सतत मागेपुढे फिरत असतात. मग बाकीच्या केसेसमध्ये का नाही? अन्य केसेसमध्ये ते तुम्हाला मागे-पुढे फिरायला लावतात. बाकीच्यांच्या केसेस महत्त्वाच्या नाहीत का? त्यांना (सरकार) सांगा सहकार्य करा; अन्यथा आम्ही थेट कारवाई करू. आम्हाला कोणाच्या चुका शोधायच्या नसून या यंत्रणेत सुधारणा करायची आहे,’ असे मुख्य न्या. चेल्लुर यांनी संतप्त होत म्हटले.‘मला येथे येऊन एक महिना झाला असून, मी येथे रुळले आहे. त्यामुळे एका महिन्यात मी ज्या पद्धतीने वागले त्या पद्धतीने मी वागेन अशी अपेक्षा करू नका. यापुढे हे चालणार नाही, अशी तंबीही मुख्य न्या. चेल्लुर यांनी सरकारला दिली. (प्रतिनिधी) सरकारची कानउघाडणी मुख्य न्या. चेल्लुर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बोलण्याची तयारी दर्शवली. गुरुवारी माझी आणि मुख्य सचिवांची बैठक झाली. या बैठकीत त्यांना उच्च न्यायालयाच्या स्थितीबाबत सांगायचे होते. मात्र मी थांबले. सरकारी वकिलांनीच सांगावे की मी कोणाशी बोलावे? येथून (उच्च न्यायालय) चालत १५ मिनिटे दूर असलेल्या मंत्रालयातून सूचना मिळण्यासाठी अनेक वर्षांची वाट पाहावी लागत असेल तर मग या सर्व अधिकाऱ्यांना मराठवाड्यासारख्या पाण्याचा तुटवडा असलेल्या ठिकाणी पाठविले पाहिजे. पाण्यासाठी वणवण करावी लागेल तेव्हा त्यांना अद्दल घडेल. तुम्ही म्हणजे सर्वस्व नाही. त्यामुळे आम्ही करू तेच योग्य या अविर्भावात राहू नका, अशा शब्दांत मुख्य न्या. चेल्लुर यांनी सरकारची कानउघाडणी केली.