शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे देवळेकर केडीएमसीचे महापौर

By admin | Updated: November 12, 2015 03:28 IST

कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी, तर भाजपाचे विक्रांत तरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी, तर भाजपाचे विक्रांत तरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. शिवसेना आणि भाजपाच्या युतीमुळे शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक या वेळी अनुपस्थित राहिले.महापालिकेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेल्या सेना-भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नाइलाजास्तव त्यांनी युतीचा मार्ग अवलंबला आहे.निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस महापौर आणि उपमहापौरपदासाठी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्यात आले होते. वाटाघाटीत महापौरपद पहिल्यांदा शिवसेनेकडे देण्याचा निर्णय झाला. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने उपस्थित होते. दुपारी १२ वाजता निवडणुकीला प्रारंभ झाला. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत सर्वांचे अर्ज वैध ठरल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रथम महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार राहुल दामले यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेच्या देवळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात येताच शिवसेना नगरसेवकांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यानंतर, उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी भाजपकडून विक्रांत तरे आणि विशाल पावशे यांनी तर शिवसेनेकडून राजेश मोरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपमहापौरपद भाजपला देण्याचा निर्णय झाल्याने शिवसेनेचे मोरे यांनी माघार घेतली. तर, भाजपच्या पावशे यांनीहीउमेदवारी मागे घेतल्याने तरे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.या वेळी शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, आमदार सुभाष भोईर, भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण आदींनी व्हीआयपी कक्षात हजेरी लावली होती. देवळेकर आणि तरे यांची निवड होताच मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. निवडणुकीच्या वेळी अनुपस्थित राहणाऱ्या मनसे नगरसेवकांनीही सभागृहात जाऊन दोघांचे अभिनंदन केले. अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका आधीच स्पष्ट केली होती, असे मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)